लोकांकडून होतेय कौतुक
अमेरिकेत एका महिलेने स्वतःचा बायोडाटा कंपनीला पाठविण्यासाठी एका नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या महिलेने स्वतःचा बायोडाटा एका केकवरच रेखाटला आहे. कार्ली पावलिनॅक ब्लॅकबर्न यांनी 5 दिवसांपूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डइनवर आपण नाइके कंपनीत नोकरीसाठी कशाप्रकारे अर्ज केला यासंबंधी खुलासा केला आहे. त्यांनी एक छायाचित्र शेअर करत केकचे छायाचित्र प्रसारित केले असून यावर त्यांनी स्वतः रिज्यूमे प्रिंट केला आहे.
अनोखी पद्धत
कार्लीने स्वतःच्या लिंक्डइन पोस्टमध्ये ‘काही आठवडय़ांपूर्वी नाइकेला केकवर स्वतःचा बायोडाटा पाठविल्याचे’ नमूद पेले आहे. हा केकवरील खाण्यायोग्य रिज्यूमे. नाइकेने जेडीआय दिन (जस्ट डू इट डे)साठी अत्यंत मोठा उत्सव साजरा केला होता. लेब्रोन जेम्स, कॉलिन कॅपरनिक समवेत अन्य दिग्गज कलाकार यात सामील सामील झाले होते. नाइकेच्या आत वॅलेंट लॅब्स नावाचा एक विभाग असून तो कंपनीच्या आयडियांसाठी एक स्टार्टअप इनक्यूबेटर असल्याचे कार्ली यांनी म्हटले आहे. कंपनी सध्या कुठल्याही पदासाठी उमेदवारांची भरती करत नाही. मला केवळ स्वतःबद्दल कंपनीला सांगायचे होते म्हणून ही कृती मी केली आहे. एका मोटय़ा पार्टीत केक पाठविण्यापेक्षा उत्तम मार्ग कुठला असू शकतो असे विधान तिने केले आहे.
पोहोचविला रेज्यूमे केक
कार्ली पावलिनॅक ब्लॅकबर्नने एका अशा पार्टीत खाण्यायोग्य रिज्यूमे केक देण्याबद्दल विचार चालविला होता, ज्यात तिला आमंत्रितही केले नव्हते. कार्लीने केक तयार केला आणि डिलिव्हरी एजंट बाल्डविनला पार्टी होणाऱया ठिकाणी प्रंट डेस्कवर केक सोडण्यासाठी सांगितले होते.