Tarun Bharat

महिला-बाल संगोपन दवाखाना इमारत बांधकाम अंतिम टप्प्यात

Advertisements

प्रतिनिधी /खानापूर 

शहरात नव्याने बांधण्यात येत असलेल्या महिला-बाल संगोपन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले असून मंगळवार दि. 9 रोजी तिसरा स्लॅब टाकण्यात आला. उर्वरित इमारतीचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या दोन महिन्यात काम पूर्ण होणार आहे. या ठिकाणी महिला व बाल संगोपन दवाखान्याचे उद्घाटन लवकर होणार असल्याची माहिती आमदार अंजली निंबाळकर यांनी दिली.

महिला-बाल संगोपन दवाखान्यासाठी पंधरा कोटीचा निधी मंजूर झाला असून महिलांसाठी अद्ययावत दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. यासाठी आमदार अंजली निंबाळकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून शासनाकडून हा दवाखाना मंजूर करून घेतला आहे. यासह नव्याने शंभर खाटांच्या दवाखान्याला मंजुरी मिळाली असून यासाठी 32 कोटांचा निधी मंजूर झाला आहे. या इमारतीचे कामही येत्या काही दिवसात सुरू करण्यात येणार आहे.

Related Stories

भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात आता दोन वाघ दाखल

Omkar B

जिल्हय़ात स्वॅब तपासणीचा आकडा 4 लाखांच्या घरात

Patil_p

कडोली गावामध्ये सॅनिटायझरची फवारणी

Amit Kulkarni

पंतप्रधानांच्या आवाहनाला शहरवासियांचा प्रतिसाद

Patil_p

पाणीपुरवठा कर्मचाऱयांचे पुन्हा आंदोलन

Amit Kulkarni

जिमखाना, बीडीके, बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ, ब संघ विजयी

Amit Kulkarni
error: Content is protected !!