Tarun Bharat

सलग 107 दिवसांपासून मॅराथॉनमध्ये धावतेय महिला

नोंद झाला विश्वविक्रम

मॅराथॉनमध्ये भाग घेणे हीच मोठी गोष्ट असते आणि मग ही शर्यत पूर्ण करणे तर आणखीन मोठी कामगिरी आहे. परंतु ऑस्ट्रेलियातील एक महिला 107 दिवसांपासून सातत्याने मॅराथॉनमध्ये भाग घेण्यासह ही शर्यतही पूर्ण करत आहे. आता तिचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे.

32 वर्षीय एर्चाना मुरे-बार्टलेटने ऑगस्ट महिन्यात क्वीन्सलँडच्या केप यॉर्कमध्ये स्वतःची मॅराथॉन सुरू केली होती. महिलांसाठीच्या मॅराथॉनचे अंतर 42.195 किलोमीटर इतके असते.

32 वर्षीय या महिलेने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकौंटवर ही अदभूत कामगिरी प्राप्त करण्याची एक क्लिप शेअर केली आहे. यात फिनिश लाइनवर लोक उभे राहून तिची प्रतीक्षा करत असल्याचे दिसून येते. हा माझ्या मॅराथॉन यात्रेचा अंत नाही, 150 चे लक्ष्य मी प्राप्त करू इच्छिते असे एर्चानाचे म्हणणे आहे. एर्चानाने वन्यजीवांच्या रक्षणासाठी सुमारे 50 हजार डॉलर्स (सुमारे 41 लाख रुपये) जमविले आहेत.

एर्चानाच्या या पोस्टवर कॉमेंट्सचा वर्षाव झाला आहे. सोशल मीडिया युजर्सनी तिचे कौतुक केले आहे. 106 मॅराथॉनचा मागील विश्वविक्रम ऑगस्टमध्ये ब्रिटिश धावपटू केट जेडेनने नोंदविला होता. एर्चाना मुरे स्वतःच्या प्रोजेक्ट टिप टू टो 2022 सह वन्यजीव संरक्षणासाठी मोहीम राबवत आहे. ही मोहीम केप यॉर्कमध्ये सुरू झाली असून त्याला ऑस्ट्रेलियात ‘टिप’ म्हणून ओळखले जाते.

Related Stories

महात्मा गांधींच्या पणतीला तुरुंगवास

Patil_p

फ्रान्सचे विदेश मंत्री भारत दौऱयावर

Patil_p

वॉशिंग्टनमध्ये गोळीबाराची घटना, एक ठार

Patil_p

पॅलेस्टाईन दूतावासात भारतीय राजदूताचा मृतदेह आढळला

datta jadhav

अधिक फैलाव, पण जीवघेणा नाही

Patil_p

टॉयलेट सीटवर बसून पूर्ण करतात शर्यत

Patil_p