Tarun Bharat

घरी 50 उंदिर पाळणारी महिला

हे उंदिर माझ्या मुलांसारखे

एका महिलेने स्वतःच्या घरात 50 उंदिर पाळले असून यातील 25 नर आणि 25 मादी आहेत. स्वतःला प्राणीप्रेमी म्हणवून घेणारी ही महिला या उंदरांची स्वतःच्या मुलांप्रमाणे देखभाल करते. तिने या उंदरांना स्वतःच्या चिकन सिंकमध्ये आंघोळ घालतानाचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला असून तो व्हायरल झाला आहे.

51 वर्षांची ही महिला या उंदरांना स्वतःची ‘बेबी’ ठरविते. महिलेने 2018 मध्ये प्रथम दोन उंदिर (एल्विस आणि चक) घरात आणले होते, ज्यानंतर तिने या उंदरांची संख्या सातत्याने वाढवत नेली. आता तिच्या घरात 50 उंदिर झाले असून आश्चर्याची बाब म्हणजे घरात एक मांजर देखील आहे.

हे उंदिर माझ्या मुलासारखी असल्याने ते काहीच चुकीचे करू शकत नाहीत. त्यांच्यातील प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. याचमुळे काही उंदिर इतरांच्या तुलनेत अधिक वेळ माझ्यासोबत राहतात. हे उंदिर मी हाक मारताच धावून येतात असे महिलेचे म्हणणे आहे.

महिलेच्या घरात 4 पाळीव श्वान, 3 मांजरं अणि दोन डुक्कर देखील आहेत. यापूर्वी तिच्याकडे दोन गायी, दोन शेळय़ा, 25 कोंबडी आणि सुमारे 15 बदके होती. प्राणी आणि प्रेमांबद्दल मला मोठी आत्मियता असल्याचे महिलेने म्हटले आहे. तिने वेगवेगळय़ा प्राण्यांच्या राहण्यासाठी वेगवेगळी जागा निर्माण करून ठेवली आहे.

या 51 वर्षीय महिलेचे नाव मिशेल रेबोन असून ती अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये राहते. ती अमेरिकन सैन्यातून निवृत्त झाली आहे. अनेक लोकांना माझे काम चांगले वाटत नाही, मी त्यांना प्राणीप्रेमाबद्दल जागरुक करते. काही लोक समजून घेतात, तर अनेक जण माझ्याशी सहमत होत नसल्याचे मिशेल सांगतात.

Related Stories

वाचन संस्कार हा ज्ञानदानाचाच संस्कार : न.म.जोशी

prashant_c

महालवजा हॉटेलात मांजराचे घर

Patil_p

अक्षयतृतीयेनिमित्त ‘दगडूशेठ गणपती’ला ११११ आंब्याचा नैवेद्य

Tousif Mujawar

शंख वाजविण्याऱयांपासून कोरोना दूर

Amit Kulkarni

कोल्हापुरातील रामाचा पार सार्वजनिक व्यासपीठ, भरायच्या जंगी सभा

Archana Banage

‘हाताच्या जादू’ने मॉल-दुकानात करतो पेमेंट

Patil_p