कृषी पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे यांचे आवाहन
Women should take advantage of Pradhan Mantri Sukhram Prosha Yojana
महिलांनी स्वत : चे आर्थिक उत्पादन वाढवण्यासाठी लहान लहान अन्न व फळेभाज्या प्रक्रिया उद्योग उभारावेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेचे अनुदान उपलब्ध असुन या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपली आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन सावंतवाडीचे कृषी पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे यांनी केले .
कुंभार्ली जीवन ग्रामसंघ आणि महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव येथे आयोजित महिला मेळाव्यात महिलांना मार्गदर्शन करताना यशवंत गव्हाणे बोलत होते. यावेळी कुंभार्लीच्या जीवन ग्रामसंघाच्या अध्यक्षा स्नेहल हरमलकर, ग्रामसंघ सचिव शोभा मेस्त्री, कोषाध्यक्ष विजया गावडे, प्रभाग समन्वयक सचिन नाईक, प्रभागसंघ व्यवस्थापक रुपाली गुडेकर यांच्यासह या प्रभाग संघातील सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
ओटवणे / प्रतिनिधी