महिलेच्या नावावर विश्वविक्रम
पूर्वी टॅटू काढून घेणे मोठी गोष्ट मानली जायची. परंतु काळासोबत हा प्रकार फॅशनचा हिस्सा ठरला आहे. टॅटू काढून घेण्याचा छंद असणारे अनेक लोक आता सहजपणे भेटतात. काही लोक स्वतःच्या शरीरात मॉडिफिकेशन करवितात, परंतु लोक वेगळे दिसण्याच्या इच्छेपोटी असे करत असतात. सध्या सोशल मीडियावर एक महिला याच कारणामुळे चर्चेत आहे.
मेक्सिकोत राहणाऱया मारियाने जगात सर्वात अधिक बॉडी मॉडिफिकेशन करविण्याचा आणि टॅटू काढून घेण्याचा विक्रम नोंदविला आहे. तिच्या शरीरात एकूण 49 मॉडिफिकेशन करण्यात आले आहेत. तसेच शरीराच्या 99 टक्के हिस्स्यात टॅटू काढण्यात आले आहेत. या लुकमुळे तिला रियल लाइफ वॅम्पायर म्हटले जाते.
जर तुम्ही माझ्या पावलावर पाऊल टाकणार असाल तर सतर्क व्हा. असे करणे सोपे नसल्याचे मारियाने म्हटले आहे. सर्वाधिक बॉडी मॉडिफिपेशनचा विक्रम करणारी मारिया यामुळे आनंदी नाही. तिला अनेकदा पूर्वीसारखे दिसण्याची इच्छा होत असते. परंतु हे तिला आता शक्य नाही. लोक तिला वॅम्पायर असे संबोधितात, तर मुले तिला पाहून घाबरत असतात.
वयाच्या 14 व्या वर्षापासून स्वतःच्या शरीरात मॉडिफिकेशन करण्यास सुरुवात केली होती असे तिने सांगितले. मारिया स्वतःच्या लुकबद्दल समाधानी आहे. तिने अनेक प्रकारचे इम्प्लांट्स करविले आहेत. यात कपाळावर शिंगापासून ओठांवर नकली दात बसविणे सामील आहे. मारियाने स्वतःच्या कानाच्या छिद्राला देखील मोठे करविले आहे. तसेच डोळय़ात टॅटू काढून घेताना तिला सर्वाधिक वेदना झाल्या होत्या. याचबारेबर इम्प्लांट्स करविणे देखील अत्यंत वेदनादायी होते.