प्रतिनिधी / यळ्ळूर
यळ्ळूरमधील रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या महिलांसाठी मजदूर नवनिर्माण संघाच्यावतीने महिला दिन साजरा करून त्यांनाही महिला दिनाचे महत्त्व पटवून दिले. अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील तर प्रमुख पाहुण्या म्हणून स्त्राrरोग तज्ञ डॉ. सुरेखा पोटे आणि वेटलिफ्टर नकुशा पाटील या उपस्थित होत्या.
प्रमुख पाहुण्या डॉ. सुरेखा पोटे यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले. महिलांनी केवळ कुटुंब सांभाळण्याइतपत मर्यादित न राहता स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा महिलांनाच आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागेल. तेव्हा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन सरकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी ग्रा. पं. पीडीओ सदानंद मराठे, वेटलिफ्टर नकुशा पाटील यांनीही विचार व्यक्त केले. महिलांनी चूल आणि मूल सांभाळण्याबरोबरच आपल्या पायावर उभे राहावे, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी मजदूर नवनिर्माण संघाच्यावतीने राहुल पाटील यांनी महिलांचा सन्मान केला आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाला कौस्तुभ पोटे, निर्मला बरसाकाळे, गुऊदेवी रामदुर्ग, शोभा कुंडेकर, कविता गोरल, रेशमा कुरंगी, सुमन गोरल, ज्योती मेलगे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.