Tarun Bharat

सदाशिवनगरमध्ये महिलांची टोळी सक्रिय

Advertisements

लोखंडी साहित्य चोरून नेल्यामुळे फटका : एपीएमसी पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ

प्रतिनिधी / बेळगाव

सदाशिवनगर परिसरात रात्रीच्यावेळी महिलांची टोळी साहित्य चोरून नेण्यामध्ये सक्रिय झाली आहे. सदाशिवनगर येथील फर्स्ट मेन रोडवर एका घरातील लोखंडी साहित्य, ग्रॅन्डर, कटर, ड्रीलमशीन, लोखंडी जाळी, लोखंडी पायऱया चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या महिला सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्या आहेत. याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेले असता त्या महिलांना पकडणे अशक्मय असल्याचे पोलीस सांगत आहेत. त्यामुळे आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? असा प्रश्न या परिसरातील सर्वसामान्य जनता करत आहे.

रात्रीच्यावेळी या महिला टोळीने बाहेर पडतात. कोणालाही घाबरत नाहीत. समोर कोणी आले तरी त्याला त्याच धमकावत आहेत. त्यामुळे नागरिकही त्यांच्याशी वाद करायचा टाळत आहेत. सदाशिवनगर येथील फर्स्ट मेन रोडवरील शिवालय मंदिराजवळ दिलीप कावेडीया यांनी नवीन घर घेतले आहे. त्या घराचे नुतनीकरण सुरू होते. त्यासाठी त्यांनी लोखंडी पायरी तसेच इतर साहित्य आणून ठेवले होते. कंत्राटदार भैरु पाटील यांनी हे साहित्य ठेवले
होते.

त्यांनी ड्रील मशीन तसेच ग्रॅन्डर, कटर हे सर्व साहित्य त्याच ठिकाणी ठेवले असता सहा ते सात महिलांनी हे सर्व साहित्य चोरून नेले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांची छबी कैद झाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर दिलीप कावेडीया यांनी एपीएमसी पोलीस स्थानकामध्ये धाव घेतली. मात्र पोलीस फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत. या टोळीला पोलीसच घाबरत आहेत. त्यांना पकडणे अशक्मय आहे. कारण त्यांच्याकडे धारदार शस्त्रs आहेत, असे पोलीस सांगत आहेत.

जनतेने कोणाकडे न्याय मागायचा?

अशाप्रकारे जर दहशत निर्माण झाली असेल तर पोलिसांनी त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. जर बंदोबस्त होत नसेल तर सर्वसामान्य जनतेने जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीसच जर घाबरत असतील तर सर्वसामान्य जनतेने कोणाकडे न्याय मागायचा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या परिसरात वारंवार चोऱया होत आहेत. यापूर्वीही प्लास्टिक, लोखंडी साहित्य चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. तेव्हा पोलिसांनी तातडीने या टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. वरि÷ पोलीस अधिकाऱयांनी तातडीने याची दखल घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

Related Stories

महसूल वसूल करण्यावर भर द्या

Amit Kulkarni

खासगी जमिनींवरील अवैध मालमत्ताधारकांना मिळणार हक्कपत्रे

Patil_p

आरपीडी चौकातील नादुरुस्त चेंबरचे अखेर बांधकाम

Amit Kulkarni

बैठकीत शिक्कामोर्तब झाल्यानंतर कुमारस्वामी लेआऊट मनपाकडे

Omkar B

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी बेळगावच्या चार बॉक्सर्सचे बळ्ळारीला प्रयाण

Amit Kulkarni

गोकाक धबधब्यानजीक मगरीचा वावर

Amit Kulkarni
error: Content is protected !!