वृत्तसंस्था/ केपटाऊन
भारतीय महिला हॉकी संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर मालिका खेळत आहे. दक्षिण आफ्रिका बरोबरच्या झालेल्या चार सामन्यांच्या हॉकी मालिकेत भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा 3-0 असा पराभव केला. या मालिकेनंतर भारतीय महिला संघाची नेदरलँडस्बरोबर तीन सामन्यांची हॉकी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात टॉप सिडेड नेदरलँडस्ने भारताचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
भारत आणि नेदरलँडस् यांच्यातील सामन्यात 24 व्या मिनिटाला भारताचे खाते ब्युटी डुंगडुंगने मैदानी गोलवर उघडले. मात्र भारताला ही आघाडी अधिक वेळ राखता आली नाही. 29 व्या मिनिटाला फेलिसी अल्बेरेसने पेनल्टी कॉर्नरवर नेदरलँडस्ला बरोबरी साधून दिली. नेदरलँडस्चा दुसरा आणि तिसरा गोल शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत नोंदवले गेले. नेंदरलँडस्तर्फे इबाय जेनसेन आणि फ्रिक मोयेस यांनी हे गोल केले. आता या मालिकेतील उभय संघातील दुसरा सामना गुरुवार 26 जानेवारीला होणार आहे.