Tarun Bharat

महिलांच्या नेशन्स चषक हॉकी स्पर्धेला आज प्रारंभ

महिलांच्या नेशन्स चषक हॉकी स्पर्धेला आज प्रारंभ

वृत्तसंस्था/ व्हॅलेन्सिया

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे नेशन्स चषक महिलांच्या हॉकी स्पर्धेला रविवारी प्रारंभ होत आहे. सविता पुनियाच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाचा रविवारी चिलीबरोबर सामना होणार आहे. भारतीय महिला संघ प्रो लीग हॉकी स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध करण्याकरता प्रयत्न करीत आहे.

महिलांच्या नेशन्स चषक हॉकी स्पर्धेत एकूण 8 संघांचा समावेश आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला 2023-24 च्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेसाठी बढती देण्यात येईल. त्याचप्रमाणे महिलांची ही स्पर्धा पुढील वषी होणाऱया आशियाई स्पर्धा तसेच 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची आहे. नेशन्स चषक महिलांच्या हॉकी स्पर्धेत भारताचा ब गटात समावेश आहे. या गटामध्ये चिली, जपान आणि दक्षिण आफ्रिका तर अ गटामध्ये आयर्लंड, इटली, कोरिया आणि स्पेन यांचा सहभाग आहे. भारतीय महिला संघाचा या स्पर्धेतील सलामीचा सामना चिलीबरोबर होणार आहे. त्यानंतर भारताचे पुढील सामने जपान तसेच दक्षिण आफ्रिकाबरोबर होतील.

Related Stories

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी विक्रमी 600 हून अधिक अर्ज

Patil_p

दिवगंत फुटबॉलपटू प्रँको यांना एएफसी प्रमुखांची श्रद्धांजली

Patil_p

यू मुंबा, पुणेरी पलटण संघांचे विजय

Patil_p

रॉबिन सिंगला 500 रुपयांचा दंड

Patil_p

सुदिरमन चषक ः चीनकडून भारताचा एकतर्फी पराभव

Patil_p

बांगलादेशला हरवून इंग्लंडची विजयी सलामी

Patil_p