मालवण /प्रतिनिधी-
मालवण शहरातील बचत गटांच्या उन्नतीसाठी आवश्यक असणारे समूह संघटक पद गेली चार वर्षे रिक्त असल्याने शहरातील महिला बचत गट आज आक्रमक बनले होते. शिवसेनेचे नेते महेश जावकर यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटांनी आज नगरपालिकेवर धडक देत नगरपालिका प्रशासनाला याबाबत जाब विचारला. नगरपालिका प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. मालवण शहरातील बचत गटांसाठी समूह संघटक पद अत्यावश्यक आहे. सदरचे पद रिक्त असल्याने महिला बचत गटांना मार्गदर्शक नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.