भुवनेश्वर (ओडिशा)
2022 च्या भारतीय महिलांच्या लीग फुटबॉल स्पर्धेतील पीआयएफए आणि शिरोडे यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. या सामन्यात दोन्ही संघाना समान गुण मिळाले.
या सामन्यात दोन्ही संघांनी शेवटपर्यंत दर्जेदार खेळ केला तसेच त्यांनी गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या त्यामुळे या सामन्यात शेवटपर्यंत गोलफलक कोराच राहिला. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात पीआयएफए संघाने तीन सामन्यांतून 4 गुणांसह चौथे स्थान तर शिरोडेने एकमेव गुण नोंदवीत 10 वे स्थान मिळविले.