Tarun Bharat

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा द.आफ्रिकेत

Advertisements

फेब्रुवारीत होणाऱया स्पर्धेत भारताची सलामी पाकिस्तानविरुद्ध

वृत्तसंस्था/ दुबई

दक्षिण आफ्रिकेत 2023 मध्ये होणाऱया महिलांच्या आठव्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताची सलामी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 12 फेब्रुवारी रोजी केपटाऊन येथे होणार आहे. आयसीसीने सोमवारी या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले.

या स्पर्धेत भारतीय महिला संघाचा समावेश गट 2 मध्ये करण्यात आला असून इंग्लंड, वेस्ट इंडीज, पाकिस्तान व पात्रता फेरीतून आलेला आयर्लंड यांचाही त्यात समावेश आहे. 10 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. भारताचा दुसरा सामनाही केपटाऊनमध्येच विंडीजविरुद्ध 15 फेब्रुवारी रोजी तर त्यापुढील सामने इंग्लंड व आयर्लंड यांच्याविरुद्ध अनुक्रमे 18 व 20 फेब्रुवारी रोजी केबेरा येथे होतील.

यजमान दक्षिण आफ्रिका व लंका यांच्यातील सामन्याने स्पर्धेचे उद्घाटन केपटाऊनमध्ये होईल. याच मैदानावर 26 फेब्रुवारी रोजी जेतेपदाची लढत आयोजित करण्यात आली असून अंतिम लढतीसाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेतील सामने केपटाऊन, पार्ल व केबेरा येथे खेळविण्यात येणार आहेत तर बाद फेरीचे सामने केपटाऊनमध्ये खेळविले जातील. दहा संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत एकूण 23 सामने होणार आहेत. बांगलादेश व आयर्लंड हे पात्रता फेरीतून आलेले संघ असून ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, द.आफ्रिका, लंका व विंडीज यांच्यासह ते या स्पर्धेत सहभागी होतील.

पाच वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या व विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलिया यांच्यासह न्यूझीलंड, यजमान द.आफ्रिका, लंका, बांगलादेश यांचा गट एकमध्ये समावेश आहे. बांगलादेशने अलीकडेच आयर्लंडचा पराभव करून महिलांच्या टी-20 वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेचे जेतेपद मिळविले. उपविजेत्या आयर्लंडला गट 2 मध्ये स्थान देण्यात आले आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघाचे प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध चार सामने होतील आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत खेळण्यास पात्र ठरतील.

Related Stories

चेतन शर्मा राष्ट्रीय निवड समितीचे नवे अध्यक्ष

Omkar B

इटालियन ब्रिगेड ठरले युरो चॅम्पियन्स!

Patil_p

हॅलेप, कोको गॉफ दुसऱया फेरीत

Patil_p

आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धेला आज प्रारंभ

Patil_p

राजस्थानच्या विजयाला नोबॉल वादाचे गालबोट!

Patil_p

महिला जिम्नॅस्ट ऍशरम निवृत्त

Patil_p
error: Content is protected !!