वृत्तसंस्था/ दुबई
दक्षिण आफ्रिकेत होणाऱया आगामी आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आयसीसीतर्फे शुक्रवारी पंच पॅनेलची घोषणा करण्यात आली. या पंच पॅनेलमध्ये सर्व महिला पंचांचा समावेश आहे. भारताच्या जीएस लक्ष्मी, वृंदा राठी आणि जननी नारायणन यांचा यामध्ये सहभाग राहील.
या प्रति÷sच्या स्पर्धेकरिता आयसीसीने एकूण तीन सामनाधिकारी आणि 10 पंच असे एकूण 13 महिला सदस्यांची निवड केली आहे. 2023 च्या रणजी हंगामात भारताच्या महिला पंच वृंदा राठी तसेच जननी नारायणन यांनी पहिल्यांदाच पंचगिरी केली होती. रणजी स्पर्धेत मैदानावर पंचगिरी करणाऱया या पहिल्या महिला पंच ठरल्या आहेत. अलीकडच्या काही वर्षांमध्ये महिला क्रिकेटचा प्रसार झपाटय़ाने होत आहे. पुरुषांच्या क्रिकेटप्रमाणेच महिला क्रिकेटलाही विविध देशातून शौकिनांकडून प्रचंड प्रतिसाद लाभत असल्याने आयसीसीने महिलांच्या क्रिकेटला यापुढे अधिक प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रामध्ये पुरुषांप्रमाणेच महिलांनाही तितकीच संधी यापुढे दिली जाणार आहे.
2020 साली झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत 8 महिला पंचांनी पंचगिरी केली होती. तसेच गेल्या वषी झालेल्या आयसीसीच्या महिलांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत 8 महिला पंच सहभागी झाल्या होत्या. सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत क्लेरी पोलोसेक ही अनुभवी पंच कार्यरत आहे. 2016 पासून पोलोसेकने महिलांच्या टी-20 तसेच वनडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दर्जेदार पंचगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाची 34 वषीय क्लेरी पोलोसेक आता दक्षिण आफ्रिकेत होणाऱया महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पंचगिरी करणार आहे. पोलोसेकची ही चौथी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आहे. दक्षिण आफ्रिकेत होणाऱया या आगामी स्पर्धेत इंग्लंडची सूई रेडफर्न, विंडीजची जॅक्वेलिनी विल्यम्स, न्यूझीलंडची किम कॉटन, दक्षिण आफ्रिकेची लॉरेन ऍगेनबॅग, तसेच दक्षिण आफ्रिकेची एस. फ्रिज ही सामनाधिकारी म्हणून राहील. लंकेची मिचेल परेरा हिचा या पॅनेल पंचमध्ये समावेश आहे. 10 फेबुवारीपासून दक्षिण आफ्रिकेत महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत आहे.
आयसीसीचे पंच पॅनेल- जीएस लक्ष्मी (भारत), वृंदा राठी आणि जननी नारायणन (भारत), एस. फ्रिज (दक्षिण आफ्रिका), मिचेल परेरा (लंका), सूई रेडफर्न (इंग्लंड), इलोसी शेरीडेन (ऑस्टेलिया), क्लेरी पोलोसेक (ऑस्ट्रेलिया), जॅक्वेलिनी विल्यम्स (विंडीज), किम कॉटन (न्यूझीलंड), लॉरेन ऍगेनबॅग (द. आफ्रिका), ऍना हॅरिस (इंग्लंड), निमाली परेरा (लंका).