वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगढ राज्यातील जांजगिर या जिल्हय़ात पिहरिद या ठिकाणी दहा वर्षांचा मुलगा राहुल बोअरवेलमध्ये पडल्यामुळे त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली होती. हा मुलगा 50 फूट खोलवर अडकलेला असल्याचे साहाय्यता पथकाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बोअरवेलपासून नजीक एक बोगदा खोदून या मुलाला वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि काही स्थानिक संघटनांनी एकत्रितरीत्या हे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला बाहेर काढण्यासाठी एक-दोन दिवस लागू शकतात, असे एनडीआरएफच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या मुलाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शक्मय ते सर्व साहाय्य केले जाईल, असे आश्वासन दिले आहे. गुजरातमधून रोबोट इंजिनियरला बोलाविण्यात आले असून यंत्रमानवाचा उपयोगही या मुलाची सुटका करण्यामध्ये केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.