Tarun Bharat

मुंबई-गोवा महामार्गाचं काम २०२३ पर्यंत पूर्ण करणार – मंत्री रवींद्र चव्हाण

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) मोठमोठे खड्डे झाल्यानं अनेक अपघाताच्या घटना घडलेल्या आहे. त्यामुळं या महामार्गाचं काम कधी होणार, असा प्रश्न सातत्यानं उपस्थित होत होता. याशिवाय सध्या पावसाळा सुरू असल्यानंही वाहनचालकांना या महामार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच गणेशोत्सवात वाहतूक सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान महामार्ग पोलिसांसमोर असतानाच या महामार्गासंदर्भात आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण (minister ravindra chavan) यांनी महत्वाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे गणेशोत्सवानिमित्त (Ganesh Festival) गावी जाणाऱ्या कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. होती, परंतु आता या महामार्गाबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी मोठी घोषणा केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत आज विधानसभेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान मंत्री रविंद्र चव्हाण यांनी येत्या गणेशोत्वाआधी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करणार असल्याची घोषणा केली, याशिवाय २०२३ च्या आधी या महामार्गाचं काम पूर्णत्वास नेण्याचंही आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्यामुळं आता मुंबई-गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : शेतकऱ्य़ांच्या प्रश्नावर विधिमंडळाच्या पायऱ्यावर पुन्हा ‘मविआ’चं आंदोलन,हातात पोस्टर घेऊन घोषणा

मुंबई-गोवा महामार्गावरील पडलेल्या खड्ड्यांमुळं गोव्याला पोहचण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा चार ते पाच तास जास्त लागत होते, त्यामुळं आता शिंदे सरकारनं या मार्गाचं काम पूर्ण करण्याची घोषणा केल्यानं दहा ते अकरा तासांत मुंबईहून गोव्याला पोहचता येणार आहे.

Related Stories

अमेरिकेतून भारतात येणार 100 व्हेंटिलेटर

datta jadhav

श्रीलंकेत मध्यरात्री संपूर्ण कॅबिनेटचा राजीनामा

datta jadhav

रत्नागिरी : राजापूर दळे येथे एकाच दिवशी तीन नेपाळी कामगारांचा मृत्यू

Abhijeet Shinde

पुणे विभागातील 5 लाख 79 हजार 550 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

महाराष्ट्रात 16,867 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

सोलापूर : रेशन घोटाळ्याच्या मुळावरच खासदार ओमराजे यांचा घाव

Abhijeet Shinde
error: Content is protected !!