विमानतळावरील टॅक्सी लिंक ट्रकचे काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार : सरावाच्या लहान विमानांसाठीही उपयोगी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव विमानतळावरील टॅक्सी लिंक ट्रकचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुख्य धावपट्टीपासून 247 मीटरचा टॅक्सी ट्रक उभारला जात आहे. लहान विमानांची यावरून ये-जा करता यावी, यासाठी ट्रक उभारण्यात आला आहे. 30 एप्रिलपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे फ्लाईंग स्कूलचे काम गतिमान होणार आहे.
बेळगाव विमानतळावर दोन फ्लाईंग टेनिंग ऑर्गनायझेशनला परवानगी मिळाली आहे. त्यासाठी जागा निश्चिती झाली असून कामालाही सुरुवात झाली आहे. बेंगळूर येथील समवर्धने प्रा. लि. तर दिल्ली येथील रेडबर्ड या कंपन्यांना अंतिम मंजुरी मिळाली आहे. या दोन्ही कंपन्यांकडून हॅंगर उभारण्यात येणार आहे. एफटीओपासून विमानतळाच्या धावपट्टीपर्यंत 247 मीटर लांब व 10.5 मीटर रुंद असा टॅक्सी लिंक ट्रक उभारला जात आहे.
सराव करून येणारी लहान विमाने मुख्य धावपट्टीपासून हँगरपर्यंत येण्यासाठी हा ट्रक्सी ट्रक असणार आहे. मागील दोन महिन्यांपासून हे काम जोमात सुरू आहे. काम पूर्ण झाले असून फिनिशिंग केले जात आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसांत पूर्ण होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.
30 एप्रिलपर्यंत ट्रक खुला करणार
फ्लाईंग टेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ)पासून मुख्य धावपट्टीपर्यंत टॅक्सी लिंक ट्रक घातला जात आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून हे काम केले जात असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. 30 एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण होऊन ट्रक खुला करण्यात येईल, अशी माहिती राजेशकुमार मौर्य यांनी दिली.
राजेशकुमार मौर्य (संचालक-बेळगाव विमानतळ)