Tarun Bharat

पोलीस स्थानकांच्या हद्दीत कामगाराची फरफट

Advertisements

चार पोलीस स्थानक फिरूनही तक्रार दाखल नाही : एटीएमकार्डमधून पैसे लांबविले

प्रतिनिधी /बेळगाव

पोलीस दलाला अधिक जनस्नेही बनविण्यासाठी गृहखाते व वरि÷ अधिकाऱयांचे प्रयत्न सुरूच असतात. कधी या प्रयत्नांना यश येते तर कधी त्यांचा उपयोगच होत नाही. हद्दीचा वाद तर नेहमीचाच आहे. या वादाचाच फटका मच्छे येथील एका कामगाराला बसला आहे.

खासगी कारखान्यात काम करणाऱया रोहित तारिहाळकर या तरुणाचे एटीएमकार्ड चोरीला गेले आहे. 6 ऑगस्ट रोजी तो रात्रपाळीवर होता. दुसऱया दिवशी रविवार दि. 7 ऑगस्ट रोजी दुपारी त्याच्या बँक खात्यातून पैसे काढल्याचा मॅसेज आला. तो तर घरीच झोपला होता. मग पैसे कोणी काढले? असा प्रश्न निर्माण झाला.

सुरुवातीला 500, 2000 नंतर 4000 शेवटी 900 रुपये काढण्यात आले. आपले एटीएमकार्ड चोरीस गेल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळेच हा प्रकार घडत असल्याचे समजताच या तरुणाने उद्यमबाग पोलीस स्थानक गाठले. आपल्या खात्यातील पैसे काढण्यात आले आहेत. आपल्याला तक्रार द्यायची आहे, असे त्याने सांगितले.

एटीएमकार्डचा वापर करून पैसे काढण्यात आले आहेत. हा प्रकार सायबर क्राईम विभागात येतो. त्यामुळे तुम्ही तेथे जा, असे सांगत या तरुणाला सीईएन पोलीस स्थानकात पाठविण्यात आले. रोहितने सीईएन पोलीस स्थानकात जाऊन घडला प्रकार सांगितला. पोलिसांनी रोहित मच्छे येथे राहतो म्हणून बेळगाव ग्रामीण पोलिसांकडे पाठविले.

पोलीस स्थानकांच्या पायऱया झिजविल्या

बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या तरुणाने घडला प्रकार सांगितला. तुझी नोकरी उद्यमबागला आहे, त्यामुळे तु उद्यमबाग पोलीस स्थानकात जा, असे सांगत त्याला पुन्हा उद्यमबागला पाठविण्यात आले आहे. चार दिवसांत चार पोलीस स्थानकांच्या पायऱया झिजवूनही अद्याप त्याची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही.

सूचनांचे पालन होतेय का?

या प्रकारावरून पोलीस दलात सध्या काय चालले आहे? हे लक्षात येते. हद्दीचा विचार करू नका, आधी तक्रार दाखल करून घ्या, असे वरि÷ अधिकारी वारंवार सांगत असतात. मात्र या सूचनांचे पालन होते आहे का? हे कोणीच पाहत नाही. या एका घटनेवरून गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासात पोलीस अधिकारी किती तत्पर आहेत? हे दिसून येते.

Related Stories

काँग्रेस नेते महादेवप्पा यांचा केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल

Abhijeet Shinde

आज महामेळावा

Amit Kulkarni

‘आप’ने दिलेल्या निवेदनाची जिल्हाधिकाऱयांकडून दखल

Omkar B

शेट्टी गल्ली येथील एक ट्रान्स्फॉर्मर अन्यत्र हलविला

Patil_p

लग्न समारंभासाठी परवानगी आवश्यकच

Amit Kulkarni

खाद्यतेलापाठोपाठ डाळी-कडधान्यांच्या दरात वाढ

Patil_p
error: Content is protected !!