तुम्ही जिम आणि एक्सरसाइजचा विचार करत असला तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ नक्की पहा. या व्हिडिओत एक व्यक्ती कुठल्याही जिम वेटप्रमाणे सोफा, बेंच आणि ट्रक्टरचे अवजड टायर उचलून एक्सरसाइज करताना दिसून येतो.
जिममध्ये जात स्वतःला फिट ठेवणे आणि पिळदार शरीर तयार करणे सोपे नी. लोक अनेकदा स्ट्रेंथ एक्सरसाइजचा निश्चय करतात, परंतु अवघड गोष्टी पाहताच त्यांचा निश्चय ढळू लागतो. परंतु एका व्यक्तीचा फिटनेस पाहून तुम्ही चकित व्हाल. हा व्यक्ती भरभक्कम गोष्टी खेळण्यांप्रमाणे उचलतो. हा प्रकार पाहून त्याला बाहुबली म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत हा व्यक्ती सोफा तसेच टॅक्टरचा टायर उचलून वर्कआउट करताना दिसून येतो. याचबरोबर तो अनेक भरभक्कम गोष्टी उचलत वर्कआउट करत असतो. इंटेंस वर्कआउट पाहून समोरचा दंगच होतो.
या व्यक्तीचे नाव मॅथियस मॅकिनॉन असल्याचे सांगण्यात येते. मॅथियस लोकांना अशाप्रकारचे इंटेंस वर्कआउट आणि बॉडीबिल्डिंगचे प्रशिक्षणही देतो. प्रथम त्याने छंद म्हणून हे सर्वकाही सुरू केले होते, परंतु आता त्याचा हा ध्यास ठरला आहे. त्याला अशाप्रकारचे स्टंट करण्यास मजा वाटू लागली आहे. तो इन्स्टाग्रामवर स्वतःचे वर्कआउट व्हिडिओ शेअर करत असतो.