प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात विविध विकासकामांना सुऊवात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते कचेरी रस्त्याची खोदाई करण्यात आली आहे. याचबरोबर त्याठिकाणी 2 कोटी 33 लाख ऊपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून या कामांना सुऊवात झाली आहे.
या रस्त्यावर आता खोदाई करण्यात आल्यामुळे वाहन चालकांना फेरा मारून जावे लागत आहे. सध्या हा मुख्य रस्ता खोदाई झाल्यामुळे कित्तूर चन्नम्माकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला यावे लागत आहे. तर काहीजण उपनोंदणी कार्यालयाजवळून असलेल्या लहान रस्त्यावरूनच दुचाकी वाहने ने-आण करावी लागत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील रस्ता तसेच इतर इमारती बांधण्यासाठी खोदाई सुरू झाली आहे. जेसीबीच्या साहाय्याने ही खोदाई सुरू आहे. या मोकळ्या जागेमध्ये यापूर्वी चारचाकी वाहने पार्किंग केली जात होती. मात्र आता त्या वाहनचालकांना इतरत्र पार्किंग करावे लागत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून जाणारा तो रस्ता नागमोडी होता. मात्र आता तो सरळ करण्यात येणार आहे. याचबरोबर इतर इमारतीदेखील बांधल्या जाणार आहेत. चारचाकी वाहनांसाठी काही जागा पार्किंग करण्यासाठी राखीव ठेवली जाणार आहे. एकूणच या कामाला युद्धपातळीवर सुऊवात झाली आहे. मात्र अधिवेशनापूर्वी हे काम पूर्ण होणे अशक्मय असल्याचे बोलले जात आहे.