प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक लॉ सोसायटीच्या आयएमईआर येथे ‘एम्प्लॉऍबिलीटी स्कील सेट्स ऍण्ड अपॉर्च्युनिटीज इन एच.आर.’ या विषयावर कार्यशाळा झाली. बेंगळूरच्या फॅलाबेलाच्या डिजीटल टॅलेंटचे प्रमुख हर्षकुमार प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील माहितीच्या अभावावर विस्तृत चर्चा केली. पुस्तक वाचणे, पॉडकॉस्ट ऐकणे यामधून नव्या घडामोडींशी आपण स्वतःला जोडून घेऊ शकतो. मनुष्यबळ हे क्षेत्र फक्त व्यवस्थापनापुरते राहिलेले नाही, तसेच तंत्रज्ञान ही उद्योगाची गरज झाली आहे, असे ते म्हणाले. प्रारंभी प्रभारी संचालक डॉ. अरीफ शेख यांनी स्वागत केले. डॉ. अजय जमनानी आणि इग्नेश शेख यांनी सूत्रसंचालन केले.