प्रतिनिधी /बेळगाव
मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ‘दुचाकी वाहनांची देखभाल आणि वाहनांचे इंजिन’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्लेथोरा कार्यशाळेत विद्यार्थ्यांना इंजिन डिसेंबल आणि असेंबलचे प्रशिक्षण व प्रत्यक्ष वाहनांच्या इंजिनचा अभ्यास करता येतो.
या कार्यशाळेमध्ये बेळगाव व परिसरातील 140 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही कार्यशाळा दोन सत्रांमध्ये घेण्यात आली. सकाळच्या सत्रात तांत्रिक बाबी शिकविण्यात आल्या. तर दुसऱया सत्रात प्रत्यक्षात इंजिनवर काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली. दुचाकीच्या नेहमीच्या तक्रारी, चाव्या हरविणे, अचानक गाडी बंद पडणे, पंक्चर होणे, याबद्दल तंत्रज्ञांनी प्रात्यक्षिके दाखविली. यासाठी विविध कंपन्यांच्या दुचाकी वापरण्यात आल्या.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजीव इनामदार उपस्थित होते. प्राचार्य डॉ. डी. जी. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. एस. एस. माशाल यांनी उपस्थितांचे स्वागत केले.