Tarun Bharat

जागतिक आयुर्वेद परिषद विद्यार्थ्यांना दाखवावी

शिक्षण खात्याची माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयांना सूचना

प्रतिनिधी /पणजी

कंपाल-पणजी येथे 8 ते 11 डिसेंबर दरम्यान होणाऱया जागतिक आयुर्वेद परिषद व प्रदर्शनास एका शाळेतील किमान 40 विद्यार्थ्यांनी तरी भेट देण्याची सूचना शिक्षण खात्याने केली असून तसे परिपत्रक शाळांना पाठवले आहे. त्यांच्यासोबत 2 शिक्षकांनाही पाठवण्यात यावे असेही खात्याने पत्रकात म्हटले आहे.

आठवी ते बारावीच्या इयत्तेतील मिळून एकुण 40 विद्यार्थी परिषदेसाठी प्रदर्शनाकरीता नेण्यात यावेत. सरकारी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा तसेच अनुदानित, विना अनुदानित व विशेष शाळांनी, त्यांच्या मुख्याध्यापकांनी, प्रमुखांनी याची नोंद घ्यावी असे परिपत्रकातून बजावण्यात आले आहे.

पहिल्या दिवशी 8 डिसेंबर रोजी तिसवाडी, बार्देशमधील शाळांनी विद्यार्थी पाठवावेत. दुसऱया दिवशी 9 डिसेंबर रोजी काणकोण, सांगे, केपे, पेडणे, सालसेतमधील शाळेतील विद्यार्थ्यांनी तेथे भेट द्यावी, असे पत्रकातून नमूद केले आहे. 10 डिसेंबर रोजी सत्तरी, डिचोली, धारबांदोडा शाळेतील विद्यार्थीवर्ग शाळांनी यावे तसेच फोंडा व मुरगांवमधील विद्यार्थीदेखील त्याचदिवशी येतील अशी व्यवस्था करण्यात यावी.

सकाळी व दुपारी अशा दोन सत्रातून या शालेय विद्यार्थीवर्गाच्या भेटी निश्चित कराव्यात. शाळा प्रमुखांनी, मुख्याध्यापकांनी याची नोंद घेवून योग्य ती व्यवस्था करावी असे निर्देश शिक्षण खात्याने परीपत्रकातून दिले आहेत. विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचा परिचय व्हावा व प्रदर्शन पहाण्यास मिळावे हा त्यामागील हेतू असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून गोव्यातील आयएएस अधिकाऱयांच्या बदल्या

Amit Kulkarni

दुकानदारांनी दामदुप्पट किमती लावू नये

Patil_p

पौष्टिक तत्त्वे असलेला ‘पंचामृत’चा फोर्टिफाईड तांदूळ बाजारात दाखल

Amit Kulkarni

यंदा काचांपासून बनवला संभाजीनगरचा राजा, दि. 15 पासून विविध कार्यक्रम

Amit Kulkarni

ज्ञान-मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी नवीन धोरण उपयुक्त

Amit Kulkarni

अंजुणे धरणाने गाठली 86 मीटर इतकी पातळी

Omkar B