Tarun Bharat

चंदगडमध्ये होणार बांबू क्लस्टर योजना

18 सप्टेंबर जागतिक बांबू संवर्धन दिन : जिल्ह्य़ात पहिला प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात

कृष्णात पुरेकर/कोल्हापूर

जिल्ह्य़ात अलीकडच्या काही वर्षात बांबू शेतीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. याला कारण ठरलेय केंद्र अन् राज्याची बांबू पीक योजना. या योजनांतून मिळणाऱ्या सबसिडीमुळे बांबू लागवडीचे क्षेत्रही वाढले आहे. सामाजिक वनीकरण विभागाने त्यातूनच ‘बांबू क्लस्टर’साठी जिल्ह्य़ातील चंदगड तालुक्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे. तो अंतिम टप्प्यात आहे. रविवारी, 18 सप्टेंबर जागतिक बांबू संवर्धन दिन. या पार्श्वभुमीवर सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभागाने कार्यशाळा आयोजित करून बांबूक्षेत्र वाढवण्याच्यादृष्टीने पाऊल टाकले आहे.

जिल्ह्य़ात सामाजिक वनीकरण विभागाकडून 2020 मध्ये 320 हेक्टरवर बांबूची लागवड झाली आहे. 2021 मध्ये सद्यस्थितीत 278 हेक्टरवर बांबूचे पीक घेतले जात आहे. नॅशनल बांबू मिशन अंतर्गत योजनेत 340 शेतकऱ्यांचा सहभाग आहे. बांबू शेतीकडे वाढलेला कल पाहूनच सामाजिक वनीकरण विभागाने बांबू क्लस्टर योजनेसाठी चंदगडचा प्रस्ताव पाठवला, तो अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्य़ात चंदगडसह शाहूवाडी, भुदरगड तालुक्यात बांबूशेती केली जात आहे. बांबू क्लस्टर योजनेमुळे चंदगडसह शेजारीला तालुक्यांना याचा लाभ होणार आहे. बांबूवर आधारीत पुरक उद्योगवाढीस मदत होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्य़ातील खेड, संगमेश्वर तालुक्यात बांबू क्लस्टर योजनेला मंजुरी मिळाली आहे. वन विभागाने कोल्हापूर जिल्ह्य़ातील चंदगडसाठी प्रस्ताव दिला आहे. बांबू क्लस्टर योजनेत बांबू पिकापासून होणारे पूरक उद्योग समाविष्ट आहेत. चंदगड तालुक्याचा बांबू प्रक्रिया उद्योगाचा प्रस्तावही लवकरच पाठवला जाणार असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागातून देण्यात आली. शेतकऱ्यांसाठी मनरेगा अंतर्गत बांबू पिकाचा समावेश आहे. नॅशनल बांबू मिशन योजनेतील लाभार्थींना 90 टक्के सबसिडीचा लाभ मिळतो आहे. अटल बांबू समृद्धी योजनेतून शेतकऱयांना सबसिडी दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढला आहे.
चंदगडच्या बांबू क्लस्टर योजनेचा प्रस्ताव अंतीम टप्प्यात आहे. येत्या दोन महिन्यात त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्य़ात बांबू लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे बांबू क्लस्टर योजनेतून जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना व्यापारी तत्वावर बांबू शेती करणे शक्य होणार आहे.

कागल आणि कसबा बावडा येथे आज कार्यशाळा
कृषी विभाग, प्रादेशिक कृषी व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, बांबू सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्र चॅप्टरच्यावतीने शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. रविवारी कसबा बावडा येथे या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाने कागल येथील नर्सरीत बांबू संवर्धन दिनी रविवारी कार्यशाळा आयोजित केली आहे.

Related Stories

पेठ वडगाव : वडगाव बाजार समितीचा जनावरांचा बाजार बंद करण्यासाठी पालिकेचे पत्र

Archana Banage

कोल्हापूर : मेघोली लघू पाटबंधारे तलाव फुटला, पिके गेली वाहून

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात नवे 14 कोरोना रूग्ण

Archana Banage

यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत 1 मार्चला जि.प.ची पाहणी

Archana Banage

आजरा तालुक्यात आणखी ४ कोरोना बाधित

Archana Banage

कोल्हापूर : सरकारी घोषणांच्या जीआरची रद्दी

Archana Banage