नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जागतिक बँकेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना आणि खासगी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी 1.75 अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे 13,834 कोटी रुपये) कर्ज मंजूर केले आहे. यापैकी एक अब्ज डॉलर्स आरोग्य क्षेत्रासाठी देण्यात आले आहेत, तर उर्वरित 75 कोटी डॉलर्स खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणार आहेत. हे कर्ज विकास धोरण कर्ज (डीपीएल) स्वरुपात असणार आहे. जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांनी भारताच्या आरोग्य क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रत्येकी 50-50 कोटी डॉलर्सची दोन पूरक कर्जे मंजूर केली आहेत.