Tarun Bharat

वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनचा निएमनवर बहिष्कार

Advertisements

निएमनविरुद्ध भविष्यात खेळणार नसल्याची घोषणा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

बुद्धिबळातील विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनने ग्रँडमास्टर हॅन्स निएमनवर खेळात फसवणुकीचा आरोप केला असून यापुढे आपण त्याच्याविरुद्ध एकदाही खेळणार नसल्याचे जाहीर केले. सध्या सुरु असलेल्या ज्युलियस बाएर जनरेशन कप बुद्धिबळ स्पर्धेतील सामन्यात कार्लसनने केवळ एकाच चालीनंतर निएमनविरुद्धची लढत सोडून दिली होती. यापूर्वी, सिन्क्यूफिल्ड कप स्पर्धेत कार्लसनला निएमनविरुद्ध धक्कादायक पराभव पत्करावा लागला. त्यावेळी आपल्याला निएमन चलाखी करत असल्याचा अंदाज आला होता, असे कार्लसनने स्पष्ट केले.

‘निएमनने जितकी कबुली दिली, त्यापेक्षा अधिक फसवेगिरी त्याने केली आहे. त्याची पटावरील प्रगती नैसर्गिक भासत नाही. सिन्क्यूफिल्ड स्पर्धेत तो अगदी पटावर ताणतणावाची स्थिती असतानाही निश्ंिचत असायचा. त्याच्या चेहऱयावर काहीही चिंता दिसून येत नव्हती. मी काळय़ा मोहऱयांनी खेळत असताना माझ्याविरुद्ध त्याने सरस कामगिरी केली. हे अगदी बोटावर मोजता येईल, इतक्याच खेळाडूंना शक्य आहे’, असे कार्लसन तपशीलवार बोलताना म्हणाला.

निएमनने वयाच्या 12 व्या वर्षी व त्यानंतर 16 व्या वर्षी ऑनलाईन बुद्धिबळ सामन्यात फसवेगिरी केली असल्याची कबुली दिली होती. पण, कार्लसनने निएमनकडून अशी आगळीक कित्येकदा झाली असल्याची शक्यता व्यक्त केली.

कार्लसन-निएमन यांच्यातील एक लढत ऑन बोर्ड झाली होती आणि त्या सामन्यात निएमनने कशी फसवणूक केली, यावर कार्लसनने कोणताही पुरावा सादर केला नाही. मात्र, निएमनने जाहीरपणे बोलण्याची संमती दर्शवली तर मी बाजू निश्चितपणाने जाहीररित्या मांडेन, असे तो ठासून म्हणाला.

Related Stories

मुंबई-ओडिशा रणजी लढत आजपासून

Patil_p

भारताला हरवून दक्षिण कोरिया अंतिम फेरीत

Amit Kulkarni

भारतीय खेळाडूंना वर्ल्ड ऍथलेटिक्स रिले स्पर्धा हुकणार

Patil_p

सेंट किट्स-नेव्हिसकडे सीपीएल स्पर्धेचे जेतेपद

Amit Kulkarni

बीसीसीआय 2 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करणार

Patil_p

वॉर्न म्हणतो, हा खेळाडू भारतातर्फे सर्व क्रिकेट प्रकारातून खेळेल!

Omkar B
error: Content is protected !!