Tarun Bharat

विश्वचषक हॉकी करंडक मणिपूरमध्ये दाखल

वृत्तसंस्था/ गौहत्ती

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या आगामी होणाऱया पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेपूर्वी हॉकी करंडकाचा प्रवास सुरू झाला असून या चषकाचे गुरुवारी रात्री मणिपूरची राजधानी इम्फाळ येथे आगमन झाले.

ही प्रति÷sची स्पर्धा 13 ते 29 जानेवारी दरम्यान ओदिशामध्ये खेळविली जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाले असून ओदिशा शहरात स्पर्धेतील सामने होणार आहेत. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या विश्व हॉकी करंडकाचा 21 दिवसांचा हा दौरा असून या दौऱयामध्ये भारतातील 13 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे. विश्व हॉकी करंडकाच्या प्रवासाला ओदिशातूनच प्रारंभ झाला असून त्याचा शेवट 5 जानेवारीला ओदिशातच होणार आहे.

इम्फाळमध्ये विश्व हॉकी चषकाचे मोठय़ा प्रमाणात स्वागत करण्यात आले. हा चषक काही कालावधीसाठी प्रदर्शनाकरिता ठेवण्यात आला होता. या समारंभाला मणिपूर राज्याचे सचिव जी. गोस्वामी, आसाम हॉकी संघटनेचे सचिव तपनकुमार दास यांनी या चषकाचे स्वागत केले. आकर्षक कलाकुसरीने बनविण्यात आलेला हा चषक तयार करण्यासाठी कलाकारांनी खूपच मेहनत घेतली आहे. या चषकावर सुवर्ण आणि प्लॅटिनम या धातूंच्या मिश्रणाचे डिझाईन काढण्यात आले आहे. सदर करंडक झारखंड हॉकी संघटनेच्या पदाधिकाऱयांकडे सोपविण्यात येणार आहे. त्यानंतर या चषकाच्या पुढील प्रवासाला सायंकाळनंतर प्रारंभ होईल.

Related Stories

किदाम्बी श्रीकांतकडून ली जियाला पराभवाचा धक्का

Patil_p

जर्मन खुल्या बॅडमिंटंन स्पर्धेला आज प्रारंभ

Patil_p

…तर आणखी उचित सांगता झाली असती!

Patil_p

गृहमंत्र्यांच्या हस्ते मिराबाई चानूचा गौरव

Patil_p

मालिका आजच जिंकण्याचा भारताचा निर्धार

Patil_p

ब्रुनो फर्नांडिस चौथ्यांदा महिन्यातील सर्वोत्तम फुटबॉलपटू

Patil_p