Tarun Bharat

जागतिक सायकल दिनानिमित्त जाणून घ्या ;सायकलचा इतिहास

Advertisements

आरोग्य : सायकल आपल्याकडे असणं हा एकेकाळी प्रतिष्ठेचा मानला जाणारा विषय ! हो, अहो अगदी खरयं हे. एक काळ असाही होता की सायकल तेव्हां फक्त श्रीमंतांकडे होती.

कालायै तस्मै नमः म्हणण्याच्या आपल्या परंपरेप्रमाणे काळ पुढे सरकला तो नवनवीन शोधांना जन्माला घालत गेला आणि आपली सायकल थोडी दुर्लक्षीत झाली . . . पण तीचे महत्व कमी झाले नाही कारण तेव्हां तीची गरज होती ती एकीकडुन दुसरीकडे जाण्याकरता एक वाहन म्हणुन आणि आज? आज तीची आवश्यकता भासते ते आरोग्य चांगलं राहावं म्हणून!

हो आज तीच्याकडे एक व्यायामाचा महत्वाचा भाग म्हणुन आजची पिढी पाहाते आहे आणि ते खरे सुध्दा आहे. आज डाॅक्टर्स आपल्याला पायी चालण्याचा जेव्हां सल्ला देतात नां तसाच सायकल चालवण्याचा देखील देतात कारण सायकल चालवल्याने आपल्या कॅलरीज् जास्त खर्च होतात. पण या महत्वपूर्ण सायकलचा जन्म कधी आणि कसा झाला हे माहिती आहे का तुम्हाला नाही ना! चला तर मग जाणून घेवूया सायकलचा इतिहास

सायकल चा इतिहास –

इतिहासात जेव्हां आपण 200 वर्ष मागे जातो तेव्हां या सायकलीचा जन्म आणि त्याची गोष्ट बघायला मिळते. 18 व्या शतकात सायकलची निर्मीती करण्यात आली होती, 1839 मध्ये किर्कपैट्रिक मैकमिलन या स्काॅटलॅंड येथील एका लोहाराने सायकलची निर्मीती करण्यापुर्वी सायकल अस्तित्वात नव्हती असे नाही पण तीच्यावर बसण्याची सोय असली तरी तीला पुढे ढकलतांना आपल्या पायांना जमीनीवर ठेउन मागे लोटावे लागत असे, असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही विश्वास सुध्दा ठेवणार नाही पण ते खरे आहे. किर्कपैट्रिक मैकमिलन यांनी त्याला पायडल लावलेत आणि ती धावायला लागली.

1817 मध्ये जर्मनी च्या बैरन फाॅन डेविस यांनी सायकलची रूपरेखा तयार केली होती, ही सायकल लाकडाची होती आणि हीचे नामकरण “ड्रेसियन” असे केले गेले होते. त्या वेळेस या सायकलची गती 15 किलोमीटर प्रती तास अशी होती. हीचा प्रयोग तसा कमी केला गेला, 1830 ते 1842 या दरम्यान ही सायकल उपयोगात आणली गेली.

त्यानंतर मात्र वेगाने यात अधिकाधीक सुधारणाच होत गेल्या. 1860, 1870, 1885, 1888 ही वर्ष सायकलच्या उत्क्रांतीची वर्ष ठरली. 1920 या साली लहान मुलांची सायकल फार प्रसिध्द झाली, 1960 साली सायकल रेसिंग करता नवीन सायकल तयार झाली.

1996 साली जी सायकल तयार झाली ती ऑलंपीक मध्ये रेसिंग करता समाविष्ट करण्यात आली. सायकल मधे नवनवीन जे बदल होत गेले त्यात माणसाचे कष्ट कसे कमी होतील याकडे फार लक्ष दिल गेलं त्यामुळेच सायकलचे वजन पुर्वीपेक्षा आता फार कमी झाल्याचे आपल्या लक्षात येईल.

सायकल उत्पादनाकरता पंजाब, हरियाणा ही राज्य अग्रेसर आहेत. आज जरी मोटारसायकलींची संख्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळत असली तरीही सायकल च्या निर्मीतीत फारसा फरक पडलेला नाही. चीन नंतर उत्पादनात भारताचाच सायकल निर्मीतीत क्रमांक लागतो.

सायकल लहान मुलांपासुन तर वृध्दांपर्यंत सगळयांनाच चालवायला अगदी सोपी आहे. पर्यावरणाकरता तसच आपल्या आरोग्याकरता सायकल चालवण्यास खुप उपयोगी आहे. तर चालवणार ना आजपासुन सायकल!

Related Stories

देशात 50,357 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

शिवबंधन नको!महाविकास आघाडीतून संधी द्या: संभाजीराजेही भूमिकेवर ठाम

Rahul Gadkar

देशात कोरोनामुक्तीचा वेग वाढला

datta jadhav

मंत्रिमंडळ विस्तार : पंतप्रधानांच्या निवासस्थानी आज महत्वाची बैठक

Abhijeet Shinde

अभिमानास्पद! महाराष्ट्रातल्या दोन बालवीरांना शौर्य पुरस्कार

prashant_c

उदयनराजे कडाडले, ‘जाणता राजा फक्त शिवाजी राजेच’

prashant_c
error: Content is protected !!