Tarun Bharat

जागतिक हृदय दिनाची यंदाची थीम खासच; ‘हर दिल के लिए दिल का इस्तेमाल’

Advertisements

World Heart Day 2022 : आज जागतिक हृदय दिन दिवस आहे. दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. ही एक जागतिक मोहीम आहे ज्याच्या मदतीने लोकांना हृदयविकारांपासून बचाव कसा करावा हे सांगितले जाते. दरवर्षी यासाठी एक खास थीम घेतली जाते आणि हा दिवस साजरा केला जातो. या वर्षाची थीम, या दिवसाचा इतिहास आणि हा दिवस का महत्त्वाचा आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. बदलती लाईफस्टाईल यामुळे हृदयविकाराचा धोका वाढला आहे. यामध्ये सर्व वयोगटातील लोकांचा समावेश आहे. खाण्याच्या सवयी आणि बैठी जीवनशैली याचा फार मोठा परिणाम शरीरावर होत आहे. यासाठी जागरूकता हवी म्हणूनच य़ंदाची थीम खास आहे.

जागतिक हृदय दिनाचा इतिहास

जागतिक हृदय महासंघ (WHF) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्या संयुक्त विद्यमाने या आंतरराष्ट्रीय दिवसाची सुरुवात झाली. डब्ल्यूएचएफचे माजी अध्यक्ष अँटोइन बायेस डी लुना यांनी ही कल्पना मांडली. हा दिवस सप्टेंबरमधील शेवटचा रविवार म्हणून घोषित केला गेला. याची सुरुवात २४ सप्टेंबर २००० रोजी सुरू झाली. नंतर २९ सप्टेंबर रोजी साजरा करण्याचे ठरले गेले.

जागतिक हृदय दिनाचे महत्त्व

जागतिक हृदय दिनाचा उद्देश लोकांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांबद्दल जागरूक करणे हा आहे. जागतिक हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या आणि जागतिक लोकसंख्येला प्रभावित करणार्‍या रोगांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक हृदय महासंघाने आज या दिवसाची स्थापना केली.

जागतिक हृदय दिन थीम

जागतिक हृदय दिन दरवर्षी वेगळ्या थीमसह साजरा केला जातो. २०२२ ची थीम खूप खास आहे. यंदाची थीम ‘प्रत्येक हृदयासाठी हृदय वापरा’ अशी आहे.

Related Stories

दिलासा : महाराष्ट्रात मागील 24 तासात 13,758 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज!

Tousif Mujawar

हेरगिरीसाठी सोडलेले पाकिस्तानातील कबुतर ताब्यात

datta jadhav

बंगाल निवडणुकीत काँग्रेसला वेगळीच भीती

Patil_p

विधानसभेला मोठ्या पक्षांसोबत युती नाही : अखिलेश यादव

datta jadhav

गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन

Archana Banage

कोरोनाची धास्ती : मध्य प्रदेश सरकारची नवी नियमावली जाहीर

Tousif Mujawar
error: Content is protected !!