World Heritage Week : सौरभ मुजुमदार,कोल्हापूर
इ.स. 1945 – 46 साली कोल्हापुरात पंचगंगा नदी काठावरील ब्रह्मपुरी टेकडी परिसरात संशोधनात्मक खोदकाम झाले. त्या उत्खननातून सापडलेल्या वस्तू सुरक्षीत ठेवण्याच्या संकल्पनेतूनच 30 जानेवारी 1946 ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडून कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाची स्थापना झाली.
सर्वप्रथम पुरातत्त्व विभागाचा समावेश असणाऱ्या या संग्रहालयात कालांतराने स्थानिक चित्रकारांच्या चित्रांसाठी स्वतंत्र विभाग करण्यात आला. संचालक पुराभिलेख व ऐतिहासिक स्मारके, मुंबई राज्य यांच्या सूचनेवरून कागल व सावंतवाडी येथून बंदुका, तोफा, हत्यारे, भाले ,तलवारी अशी विविध दुर्मिळ शस्त्र आणून स्वतंत्र असा शस्त्रास्त्र विभाग साकारला. काही लाकडी वस्तू, पंचधातूच्या तसेच पितळेच्या अत्यंत बारीक कलाकुसर असणाऱ्या देवदेवतांच्या मूर्ती ,पुतळे ,भरजरी पंखे ,मातीची व भाजीव मातीवर कलाकुसर केलेली नक्षीदार मातीची भांडी ,जुनी वस्त्र ,चंदन मूर्ती दुर्मिळ पंचांग इत्यादींचा आणखीन एक विभाग तयार केला. साधारणतः इ. स. पूर्व 200 पासून म्हणजेच सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा कोल्हापूरचा इतिहास जगापुढे मांडणाऱ्या दुर्मिळ वस्तूंनी साकारलेले हे अमूल्य वस्तूसंग्रहालय आजही इतिहास संशोधक व अभ्यासकांना एक अनमोल ठेवाच आहे.
अत्यंत नियोजनबद्ध मांडणी केलेल्या या संग्रहालयात या दुर्मिळ वस्तूंचा ठेवा
1)e†Meuheoeueve,
2) पुरातत्त्व दालन,
3)Mem$eem$e दालन ,
4)संकीर्ण कलाकृती,
5)e†®e$ekeÀueeke=Àleer ,
6) धातू वस्तू दालन अशा विविध स्वरूपात मांडलेला आहे.
ब्रह्मपुरी उत्खनन, केशवराव भोसले नाटय़गृह ,कपिलतीर्थ तलाव , श्री महालक्ष्मी मंदिर ,फॉरेस्ट विभाग रायबाग, पन्हाळा, शिवाजी पेठ,सांगरूळ, कसबा बीड,अशा विविध ठिकाणी सापडलेल्या कोल्हापूरच्या इतिहासाशी घट्ट नाळ जुळलेल्या शेकडो वस्तू संस्थानकालीन वैभव दाखविणारा दरबारी पोशाख, पंचधातूंच्या देवदेवतांच्या इ.स. अकराव्या शतकातील विविध मूर्ती, शिल्पकलाकृती तसेच तत्कालीन कोल्हापूरचे ग्रामीण चित्र ,पंचगंगा नदी, रंकाळा, पन्हाळा हे आपल्या कुंचल्यातून महान चित्रकारांनी साकारलेली दुर्मिळ चित्रे असा हा अमूल्य खजिना याच राज्य शासनाच्या कोल्हापूर वस्तुसंग्रहालयात पहावयास मिळतो.
हेही वाचा- दाट वृक्षांच्या सावलीत आजही इतिहासाची साक्ष देतेय कोल्हापुरातील ‘ही’ वास्तू
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ग्रीक, रोमन देशांशी असणारे व्यापारी संबंध सिद्ध करणाऱ्या साक्षीदार कलाकृती, विविध राजघराण्यांची कारकीर्द, अशा या संग्रहालयास इ.स .1948 ला एका महिन्यात सुमारे 2500 पर्यटकांनी भेट दिल्याची ऐतिहासिक नोंद कोल्हापूर राज्याने प्रकाशित केलेल्या कागदपत्रात आढळते.याच वस्तु संग्रहालयाच्या टाऊन हॉलच्या इमारतीसमोर बरोबर मध्य केंद्रावर शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा संगमरवरी शुभ्र पांढरा पुतळा कोल्हापूरचे रेसिडेंट कोल.ई. ओब्रेन यांनी 6 मे 1927 रोजी बसविला हे तेथील कोनशिले वरूनच समजते.
आपलाच ऐतिहासिक वारसा जगासमोर मांडणारे हे अमूल्य वस्तुसंग्रहालय पर्यटक, स्थानिक रहिवाशी, इतिहास संशोधक व अभ्यासक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या वारसा संग्रहालयास अवश्य भेट द्यावी असे आवाहन पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयामार्फत करण्यात आले.
या वस्तूसंग्रहालयात ग्रीक समुद्रदेवतेचा अमुल्य इतिहासाच्या साक्षीदाराचा पुतळा आहे. याचप्रमाणे येथील प्रत्येक वस्तू ही तत्कालीन इतिहासाचा जणू काही साक्षीदारच आहे.केवळ अभ्यासकांनी या वस्तू संग्रहालयास भेट देणे इतकेच अपेक्षित नसून सामान्य व्यक्तींपर्यंत याची माहिती पोहोचविण्याचा आमचा सदैव प्रामाणिक प्रयत्न राहील तरच हा ठेवा, संस्कृती ,व वारसा अबाधित राहील.
उ.शं.सुर्वे,सहाय्यक अभिरक्षक,कोल्हापूर वस्तुसंग्रहालय


next post