Tarun Bharat

World Heritage Week : कोल्हापूरचे प्रेरणास्थान लक्ष्मी विलास पॅलेस

Advertisements

World Heritage Week : सौरभ मुजुमदार,कोल्हापूर
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थान म्हणजेच पवित्र वास्तु लक्ष्मी विलास पॅलेस.26 जून इ.स. 1874 रोजी महाराजांचा जन्म येथे झाला.महाराजांचे जनक वडील श्रीमंत जयसिंगराव आबासाहेब घाटगे यांची ही वास्तू.कागलकर सरकार म्हणून त्यांना ओळखत असल्याने या भागाला आजही कागलवाडी म्हणून संबोधले जाते.कालांतराने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपले प्रेरणास्थान म्हणून लक्ष्मी विलास पॅलेस आपणाकडे घेतले.स्वतः महाराज येथे नेहमी विश्रांतीसाठी येत असत तसेच आपल्या रयतेसोबत भेटीगाठी,सल्लामसलत करीत असत.

शिक्षण,शेती,अर्थ,दिन दलितांसाठी वसतिगृहे,अनेक संस्थांची उभारणी,अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्या प्रजेच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या प्रत्यक्ष वास्तव्याने पवित्र झालेली ही वास्तू 3 मार्च इ.स .1977 रोजी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडून राज्यसंरक्षित स्मारक म्हणून घोषित झाली.नंतर पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागामार्फत झालेल्या या वास्तूला आराखड्यानुसार मूळ स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू आहे.करवीर संस्थानच्या छत्रपती घराण्यातील संभाजीराजे छत्रपती यांचे बहुमूल्य मार्गदर्शन आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज संग्रहालय
आपल्या लोकप्रिय राजाची इत्तंभूत माहिती ही स्थानिक नागरिकांसोबत,येणाऱ्या परराज्यातील,परदेशातील पर्यटकांना व्हावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या लक्ष्मीविलास पॅलेस मध्ये हे संग्रहालय नावारूपास येत आहे.महाराजांच्या राज्यकारभारावेळच्या विविध दुर्मिळ वस्तू,छायाचित्रे,पत्र लेखनाच्या मूळ प्रति,आदेश, जाहीरनामे,शस्त्रास्त्रअशा विविध गोष्टींनी हा खजिना या जागतिक वारसा सप्ताहनिमित्त सामान्य जनतेसमोर पाहण्यासाठी खुला होत आहे.संग्रहालयाच्या उभारणीमध्ये इतिहास संशोधकांचे मार्गदर्शन यामध्ये प्रामुख्याने इंद्रजीत सावंत तसेच मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

संस्थानच्या ध्वजस्तंभाच्या पायाची बीड धातूची सुंदर नक्षीकाम असणारी एक वस्तू,तसेच प्रकाश व्यवस्थेमध्ये आपली सेवा बजाविलेले जर्मन मेड पेट्रोमॅक्स कंपनीचे रॉकेल व गॅसचे तत्कालीन लटकते दिवे,संस्थान काळातील मुद्रांकावरील स्टॅम्पचे मूळ रूपातील विविध साचे,महाराजांनी संस्थानातील शेतीसाठी तोफा वितळून केलेले किर्लोस्कर कंपनीचे नांगर,अशा विविध दुर्मीळ वस्तूंसोबत राजर्षी शाहू महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती आकर्षक अशा दहा पुतळ्यांमधून 4 मोर्चेलधारी व 2 चौर्याधारी ,2 दंडधारी व स्वतः महाराज यातून साकारलेली आहे. राजर्षी शाहू कृतज्ञता पर्वांतर्गत बनवलेल्या महाराजांच्या हत्तीच्या रथाची हत्तीसह साकारलेली प्रतिकृती तर उल्लेखनीय आहे.

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ छायाचित्र
इ.स.1902 मध्ये लंडनमध्ये एडवर्ड सातवा याच्या राज्याभिषेकासाठी राजर्षी शाहू महाराज उपस्थित होते.त्याकाळी जगभरातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या छायाचित्रणासाठी लंडनमधील लफाएत हा स्टुडिओ प्रसिद्ध होता.येथेच महाराजांनी दरबारी पोशाखात आपले छायाचित्र काढले.सदर छायाचित्राची निगेटिव्ह स्टुडिओकडून हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय लंडन यांचे संग्रहात ठेवण्यात आली होती.त्याचा शोध घेऊन अथक प्रयत्नानंतर त्याची सॉफ्ट कॉपी संगणकीय प्रणालीद्वारे केवळ याच संग्रहालयासाठी प्राप्त करून घेण्यात आली.त्यावरून त्याची एक प्रत कोल्हापूर येथेच मुद्रित करून या संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.याची उंची साधारण आठ फूट तर रुंदी सहा फूट असून ती सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात आलेली आहे.पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभाग हे संग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे व वस्तुनिष्ठ बनवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असून तमाम शाहू प्रेमींना आवाहन करते की अशा स्वरूपाची महाराजांची मूळ छायाचित्रे अथवा वस्तू कोणाच्या संग्रहात असतील तर ती या विभागास उपलब्ध करून दिल्यास त्याची डिजिटल परत संग्रहालयाकरता काढून घेऊन मूळ प्रत संग्रहकास परत दिली जाईल तसेच सदर संग्रहकाच्या नावानिशी कलावस्तूची नोंदणी करून त्याबाबत अधिकृत प्रमाणपत्र शासनामार्फत सदर व्यक्तीस देण्यात येईल.
उत्तम रा.कांबळे,बगीचा उप अवेक्षक,लक्ष्मी विलास पॅलेस,कोल्हापूर

अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा-

दाट वृक्षांच्या सावलीत आजही इतिहासाची साक्ष देतेय कोल्हापुरातील ‘ही’ वास्तू

World Heritage Week : जागतिक वारसा जपणारे कोल्हापूर वस्तुसंग्रहालय

World Heritage Week : सातवाहनकालीन कोल्हापूरचा इतिहास


World Heritage Week :कोल्हापूरच्या चिरंतन स्मृतींचे चित्रदालन

World Heritage Week :दुर्मिळ शस्त्रभांडाराचे शस्त्रास्त्र दालन

Related Stories

JEE, NEET परीक्षा वेळेतच होणार : सुप्रीम कोर्ट

datta jadhav

पंतप्रधान मोदींचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुण अधिक आवडतो: खासदार मुंडे

Archana Banage

“भाजपची अवस्था म्हणजे, मी नाही त्यातली आणि…”, पिंपरी-चिंचवड पालिका भ्रष्टाचारावरून शिवसेनेचा खोचक टोला

Archana Banage

इचलकरंजीत बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त

Patil_p

विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने कडबा वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीला आग

Abhijeet Khandekar

शिवसेना-भाजप युतीबाबत केसरकरांचा गौप्यस्फोट ; म्हणाले, राणेंमुळे युती…

Archana Banage
error: Content is protected !!