Tarun Bharat

कनिष्ठांची विश्व बॅडमिंटन स्पर्धा ऑक्टोबरात स्पेनमध्ये

Advertisements

भारताची भिस्त प्रामुख्याने उन्नती हुडा-अनुपमा उपाध्याय यांच्यावर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विश्व बॅडमिंटन फेडरेशनची कनिष्ठांची  विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धा स्पेनमधील सांतान्दार येथे 17 ते 30 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेमध्ये अलीकडेच कनिष्ठां विभागात टॉप सीडेड अनुपमा उपाध्याय तसेच उन्नती हुडा यांच्यावर भारताची भिस्त राहील.

कोरोना महामारी समस्येमुळे सदर प्रति÷sची स्पर्धा दोन वर्षांनंतर भरविली जात आहे. स्पेनमध्ये होणाऱया या स्पर्धेला यावेळी चांगलाच प्रतिसाद अपेक्षित आहे. या स्पर्धेसाठी अखिल भारतीय बॅडमिंटन फेडरेशनने भारतीय कनि÷ बॅडमिंटन संघाची घोषणा केली आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करताना फेडरेशनच्या निवड समिती प्रक्रियेनुसार यापूर्वी घेण्यात आलेल्या अखिल भारतीय मानांकन पातळीवरील दोन स्पर्धा तसेच त्यानंतर रायपूरमध्ये झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतील बॅडमिंटनपटूंच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला.

मुलींच्या एकेरी निवड चाचणीमध्ये उन्नती हुडाने अग्रस्थान मिळविले. या निवड चाचणीत एस. रक्षिताश्री आणि अनुपमा उपाध्याय यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. मुलांच्या विभागात सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये असलेल्या भरत राघवने गोवा आणि पंचकुला येथे झालेल्या अखिल भारतीय मानांकन कनि÷ांच्या बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविले. मुलांच्या एकेरीत शंकर मुथ्थुस्वामी तसेच आयुष्य शेट्टी भारताचे प्रतिनिधित्व करतील. बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 5 कांस्यपदके मिळविली. 2018 साली झालेल्या स्पर्धेत भारताचा लक्ष्य सेन कांस्यपदक मिळविणारा शेवटचा भारतीय बॅडमिंटनपटू आहे. लक्ष्य सेनने बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते.

स्पेनमध्ये होणारी कनिष्ठांची विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धा भारतीय बॅडमिंटनपटूंना पदक मिळविण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, भारतीय बॅडमिंटनपटूंना या स्पर्धेत विविध देशांच्या अनेक अव्वल कनि÷ बॅडमिंटनपटूंचे कडवे आव्हान राहील. मिश्र सांघिक प्रकारामध्ये भारताला पदके मिळविण्याची संधी निश्चितच आहे. मिश्र सांघिक प्रकारामध्ये भारताच्या दोन जोडय़ा सहभागी होत आहेत. पुरुष आणि महिला दुहेरीत तसेच मिश्र दुहेरीमध्ये या जोडय़ा भारताचे प्रतिनिधित्व करतील. अर्ष मोहम्मद आणि अभिनव ठाकुर त्याचप्रमाणे निकोलास नाथनराज व तुषार सुवेर या दोन भारतीय जोडय़ा पुरुष दुहेरीत भाग घेतील. महिलांच्या दुहेरीत इशरानी बारुआ आणि देविका सिहाग, त्याचप्रमाणे श्रेया बालाजी व एन. श्रीनिधी भारताचे प्रतिनिधित्व करतील.

भारतीय बॅडमिंटन संघ ः मुले एकेरी- भरत राघव, शंकर मुथ्थुस्वामी, आयुष शेट्टी, मुली एकेरी- उन्नती हुडा, रक्षिताश्री, अनुपमा उपाध्याय, मुले दुहेरी- अर्ष मोहम्मद व अभिनव ठाकुर, निकोलास नाथनराज आणि तुषार सुवेर, मुली दुहेरी- इशरानी बारुआ आणि देविका सिहाग, श्रेया बालाजी व एन. श्रीनिधी, मिश्र दुहेरी- समरवीर-राधिका शर्मा, विघ्नेश टी. आणि श्रीसाई श्रेया लकमराजू.

Related Stories

‘खेलरत्न’साठी साई प्रणित, श्रीकांत ,कोनेरू हंपीची शिफारस

Amit Kulkarni

दहशतवाद्यांशी भाजपचा संबंध नसल्याचे स्पष्टीकरण

Patil_p

विजय हजारे करंडकसाठी मुंबई संघ जाहीर

Patil_p

डायमंड लीगमध्ये अविनाश साबळेला पाचवे स्थान

Patil_p

भारताचा उपांत्य फेरीत पराभव

Patil_p

रणजीत महाराष्ट्राचा बावन्नकशी विजय

Patil_p
error: Content is protected !!