प्रतिनिधी /बेळगाव
ज्ञानदीप शिक्षण संस्था टिळकवाडी संचलित जी. जी. चिटणीस इंग्रजी माध्यम शाळेमध्ये नुकताच जागतिक लोकसंख्या दिन आयोजित करण्यात आला. शिक्षिका झेबा मुल्ला यांनी प्रास्ताविकात लोकसंख्या वाढीच्या समस्या व त्याचे परिणाम याविषयी माहिती सांगितली.
इ. 9 वीची विद्यार्थिनी मुल्लिका मुजावर हिने विचार व्यक्त केले. इ. 6 वीची विद्यार्थिनी अतिथी शेट्टी हिने लोकसंख्या स्फोटाच्या परिणामाबद्दल माहिती दिली. मुख्याध्यापिका डॉ. नवीना शेट्टीगार यांनी लोकसंख्या वाढीचे परिणाम व जनजागृती कशी करावी, याबद्दल विचार मांडले. विद्यार्थिनींनी जनजागृतीला संबोधित गीत सादर केले. यावेळी स्वाती घोडेकर, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. झेबा मुल्ला यांनी आभार मानले.