वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023 साली महिलांची विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धा भारतात होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी भारताला पहिल्यांदाच लाभली आहे. दोन वर्षापूर्वी पुरुषांची विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धा भारतात खेळवली जाणार होती. आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटनेला आवश्यक असलेली रक्कम भारताकडून देण्यात न आल्याने भारताने ही संधी गमवली होती.
भारतामध्ये यापूर्वी एकदाही पुरुषांची विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत झालेली नाही. इलाईट महिलांची मुष्टीयुद्ध स्पर्धा भारतामध्ये आतापर्यंत दोनवेळा झाली आहे. 2006 साली तसेच 2018 साली इलाईट महिलांची मुष्टीयुद्ध स्पर्धा दिल्लीमध्ये झाली होती. आता नवी दिल्ली शहराला ही स्पर्धा भरविण्याची संधी तिसऱयांदा मिळत आहे. आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटनेचे अध्यक्ष क्रेमलेव्ह हे लवकरच भारताला भेट देणार असून या भेटीमध्ये पुढील वर्षीच्या महिलांच्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित करण्यात येईल अशी माहिती अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनचे सरचिटणीस हेमंता कलिता यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.