Tarun Bharat

जगातील सर्वात मोठय़ा ज्वालामुखीत विस्फोट

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

हवाई येथील जगातील सर्वात मोठा सक्रीय ज्वालामुखी मौला लोआमध्ये विस्फोट झाला आहे. हा ज्वालामुखी जागृत झाल्याने परिसराला लाल रंगात दिसून येत आहे. युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्व्हेनुसार मौना लोआच्या शिखरावर रविवारी रात्री सुमारे 11.30 वाजता विस्फोट झाला. ज्वालामुखीतून आता लाव्हारस बाहेर पडत असला तरीही स्थानिक लोकांना याचा कुठलाच धोका नाही. सुमारे 4 दशकांमध्ये पहिल्यांदाच या ज्वालामुखीत विस्फोट झाला आहे.

ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख अन् वायू वाऱयामुळे कुठेही पोहोचू शकतो. ज्वालामुखीतून लाव्हारस बाहेर पडण्याचा वेग बदलण्याची शक्यता आहे. विस्फोट वाढल्यास लाव्हारस वेगाने खालच्या दिशेने वाहत येणार असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात आले.

हवाई येथील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रण आणि पर्यटन प्राधिकरणाने नागरी वस्ती असलेल्या भागांमध्ये सध्या कुठलाच धोका नसल्याचे म्हटले आहे. स्थानिक लोकांनी ज्वालामुखीशी निगडित छायाचित्रे अन् व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्या असून यात आकाश पूर्णपणे लाल रंगाचे झाल्याचे दिसून येते.

जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी असलेल्या मौना लोआ हा समुद्रसपाटीपासून 13,600 फुटांच्या उंचीवर आहे. यापूर्वी 1984 मध्ये या ज्वालामुखीत विस्फोट झाला होता. या ज्वालामुखीतून बाहेर पडणारे वायू जीवघेणे ठरू शकतात. तसेच मोठय़ा प्रमाणात राख आणि वायू यातून बाहेर पडल्यास स्थानिक लोकांचे स्थलांतर करावे लागू शकते.

Related Stories

चीनकडून आता उत्सुल मुस्लीम लक्ष्य

Patil_p

अबू धाबीमध्ये ड्रोन हल्ला

Patil_p

तणावाच्या कारणास्तव जगातील ‘चिप’ उद्योगात चढउतार

Patil_p

स्वतःचे शिर कापणारा विचित्र सागरी जीव

Patil_p

डोनाल्ड ट्रम्प सिनेटकडून दोषमुक्त

Patil_p

पंतप्रधान मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

Patil_p