128 वर्षांच्या होतय जोहाना माजिबुको
वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
जगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेत राहणारया जोहाना माजिबुको या निधनासमयी 128 वर्षांच्या होत्या. त्यांचा जन्म 1894 साली झाला होता. जोहाना यांच्याकडे त्यांच्या जन्मतारखेची पुष्टी करणारे एक ओळखपत्र होते. त्यावर त्यांची जन्मतारीख 11 मे 1894 नमूद होती. जोहाना यांना एकूण 12 भावंडं होती, यातील 3 हयात आहेत. जोहाना यांनी कधीच शिक्षण घेतले नव्हते. शेतामध्ये काम करून त्यांनी स्वतःचे घर चालविले होते. 128 वर्षीय जोहाना यांचा जन्म 18 व्या शतकात झाला होता. त्यांनी 1914 मध्ये झालेले पहिले महायुद्ध, 1939 मध्ये झालेले दुसरे महायुद्ध पाहिले होते. स्पॅनिश फ्ल्यूपासून कोरोना महामारीलाही त्यांनी तोंड दिले आहे. सर्वात वृद्ध म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचे नाव नोंदले गेले नसल्याचे समजते.