Tarun Bharat

उपासना…2

उपासनेला दृढ चालवावे ही पहिली ओळ वाचली आणि लक्षात आलं की आजकाल आम्ही कोणत्याही गोष्टीवरती स्थिरचिताने विचार न करणारे, सतत नोकरी बदलणारे, सतत आवडीनिवडी बदलणारे, आम्ही कोणती उपासना दृढचित्ताने करणार आहोत का? असा प्रश्न पडतो. प्राचीन काळी एका गुरुकुलामध्ये काही विद्यार्थी शिकत होते. प्रत्येकाला या उपासनेचा हाच श्लोक शिकवला जायचा. नंतर रोज नित्यकर्म करायला प्रत्येकाला पाठवलं जायचं आश्रमातली काही काम देखील या मुलांसाठी सांगून ठेवलेली होती सकाळी उठल्यानंतर पाणी भरणे साफसफाई करणं, जळण्यासाठी लाकडं गोळा करणे, धान्य दळण, आणि जेवण बनवणं त्याचबरोबर गुरूंची सेवा, गुरूंच्या कुटुंबाची सेवा आणि स्वतःचा अभ्यास या सगळय़ातून मुलाचं संपूर्ण व्यक्तिमत्व घडवलं जायचं. अशावेळी शिक्षण पूर्ण होण्याचा काळ जेव्हा जवळ येता त्यावेळी गुरुजी मुलांची परीक्षा घ्यायचे. मुलांना प्रश्नांची उत्तरे नीट देता येतात की नाही ते बघितले जायचं. अशाच एकदा परीक्षेमध्ये गुरुजींनी मुलांना काम दिलं सकाळी उठून प्रत्येकाने नदीतून टोपलीमध्ये पाणी भरून आणायचं आणि बागेला घालायचं असं साधं सरळ काम होतं मुलं सकाळी आनंदाने उठली आणि अंगणामध्ये ठेवलेल्या टोपल्या घेऊन नदीवरती निघाली. पण त्या टोपल्या बांबूच्या काठय़ांपासून विणलेल्या होत्या. हे सगळं पाहिल्यावर काही मुलं वैतागली आणि हे कसलं काम म्हणून चिडचिड सुरू केली. काही मुलं त्यातले त्यात आपले दोन्ही हात टोपलीच्या खाली लावून जेवढं पाणी उरेल तेवढे पाणी आश्रमापर्यंत घेऊन येत होता. परंतु संध्याकाळपर्यंत सगळी मुलं कंटाळली आणि सगळय़ांनी काम अर्धवट सोडून दिलं होतं. एकच मुलगा मात्र हे काम सकाळपर्यंत करत होता. सकाळी गुरुजींनी उठून पाहिलं बाकीची मुलंही उठून जेव्हा बघायला आली तेव्हा संपूर्ण बागेला पाणी घालून झालेलं होतं हे पाणी कोण घालते हे बघायला गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा सर्वोत्तम शिष्य हे काम करत होता. कारण कोणतेही काम दृढपणे करताना आपल्या गुरु वरती नि÷ाही ठेवायला हवी हेही तो विसरला नव्हता.गुरुजींनी जी टोपली दिली होती ती टोपली बांबूची असल्यामुळे पाण्यामध्ये सतत भिजून ती संध्याकाळ नंतर फुगायला लागली होती. आणि आपोआपच त्या फटी बंद  झाल्या होत्या आणि काम पूर्ण झालं होतं. ” ज्ञान तृष्णा गुरुर्नि÷ा सदा अध्ययन दक्षता …”या ओळीनुसार त्याचं काम पूर्ण झालं होतं अध्ययन करताना ते नि÷ा पूर्वक आणि दृढतेने केल्यामुळेच त्याची उपासना पूर्ण झाली होती ही उपासना शुद्ध चित्ताने केल्यामुळे तन मन धनाने तो ते काम करत होता कोणतेही काम याच पद्धतीने केलं किती उपासना देवापर्यंत नक्की पोहोचते म्हणून उपासनेचे महत्त्व.

Related Stories

मंडला कला काय आहे आणि त्याचे महत्त्व काय?

Patil_p

महामारीनंतरचे जग

Patil_p

हिंसाचार त्वरित थांबवा

Amit Kulkarni

नरेंद्र मोदीः विळखा आवळू लागला

Patil_p

विषय महात्म्य

Patil_p

मै शायर तो नही !

Patil_p