प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावच्या दुर्गामाता दौडमधील मानाच्या ध्वजाच्या चांदीच्या काठीवर दैवज्ञ समाजाच्यावतीने साडेतीन शक्तीपिठांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या आहेत. 251 ग्रॅम चांदीचा वापर करण्यात आला आहे. 251 ग्रॅम चांदी तसेच प्रतिमांना सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. या काठीला साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणाऱया करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीच्या मंदिरात विधीपूर्वक पूजा करण्यात आली.
महालक्ष्मी मंदिराचे पुजारी पंकज गुरुजी यांच्या हस्ते काठीचे पूजन करण्यात आले. यासाठी मंदिराचे सदस्य कुणाल सावंत यांनी सहकार्य केले. यावेळी विकास मांडेकर, विनोद हंगीरकर, प्रफुल्ल शिरवलकर, गिरीष धामणेकर, निशांत मांडेकर यासह कोल्हापूर येथील धारकरी उपस्थित होते.
सेंट्रल हायस्कूलच्या 1988 चे माजी विद्यार्थी मित्रपरिवाराकडून यासाठी निधी उभारण्यात आला होता. निधी उभारण्यासाठी विनोद हंगीरकर, गिरीष धामणेकर, संजय हिशोबकर, प्रफुल्ल शिरवलकर, विकास मांडेकर, चंद्रशेखर पाटणेकर, लक्ष्मीकांत हावळ, अनंत चौगुले, आदिनाथ सालगुडे, सचिन उसुलकर, शशिकांत उंदरे, गजानन, अनिल गुंडुचे, बांदेकर, हभप राजू कावळे महाराज यांनी आर्थिक योगदान दिले.