प्रतिनिधी/ बेळगाव
बाजार गल्ली, वडगाव येथील दक्षिणाभिमुख मारुती मंदिरात कार्तिकी पांडव पंचमीनिमित्त शनिवार दि. 29 रोजी सकाळी मारुतीला पंचाभिषेक घालण्यात आला. पुजारी बद्रीनाथ कुलकर्णी यांनी लोणी, खवा, काजू, बदाम, मनुका या साहित्याचा उपयोग करून मारुतीला लेप लावला. रुईच्या पानांवर विठ्ठल नामाचा लिहिलेला हार घालून आरती करण्यात आली. सर्व भाविकांना तीर्थप्रसाद देण्यात आला. यावेळी राजू कुबसद, यल्लाप्पा पाटील, दामोदर पिळणकर, वैजनाथ उचुकर व भाविक उपस्थित होते.