Tarun Bharat

संजय पवारांच्या विजयासाठी शिवसैनिकांचा दंडवत

Advertisements

तरुणभारत ऑनलाइन टीम

शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवारी मिळालेले शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार हे गेली 33 वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले आहेत. येणाऱ्या राज्यसभेत त्यांच्या विजयासाठी एका शिवसैनिकाने वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबाला दंडवत घातला आहे. करवीर तालुकाध्यक्ष विनोद खोत यांनी हा दंडवत रविवारी घातला आहे.

सर्वसामान्य शिवसैनिक यांच्यासारखे एक लढवय्या असलेल्या आणि तीन वेळा नगरसेवक असलेल्या शिवसैनिकाला शिवसेनेकडून अनपेक्षितपणे थेट खासदारकीची उमेदवारी दिल्याने जिल्ह्यात माझ्यासारख्या असंख्य शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे . नगरसेवक पासून थेट खासदारकी मिळवणारे संजय पवार हे जिल्ह्यातील राज्यसभेचे पहिले खासदार ठरणार असून, या निवडणुकीत त्यांना विजय प्राप्त व्हावा यासाठी दंडवत घालत असल्याचं विनोद खोत यांनी सांगितले.

यावेळी शिवसेनाचे .सुरेश वारके,भारत खोत,दीपक वारके,राजू आरडे,पुजारी बाळासो गोविंद ठाकरे,अक्षय ठाकरे,स्वराज खोत उपस्थित होते.

Related Stories

‘काँग्रेसला स्वबळावर लढायचंय तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना मिरच्या का झोंबतात?’

Abhijeet Shinde

सुरुपलीचे जॅकवेल जमिनदोस्त; ३० लाखाचे नुकसान

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गणेशमूर्तीच्या उंचीची मर्यादा रद्द करा

Abhijeet Shinde

गवारेड्याच्या धडकेत निढोरीतील निवृत्त वनाधिकारी गंभीर जखमी

Abhijeet Shinde

खेळाडूंनी आयपीएलपेक्षा देशाला प्राधान्य द्यावे :कपिल देव

Sumit Tambekar

शास्त्रीनगर मैदानासाठी 2 कोटी देणार – पालकमंत्री

Sumit Tambekar
error: Content is protected !!