श्री व्हन्नरामाई देवी यात्रोत्सवानिमित्त आयोजन
नंदगड/वार्ताहर
कसबा नंदगड (ता. खानापूर)येथील श्री व्हन्नरामाई देवी यात्रेनिमित्त मंगळवार दि. 3 रोजी दुपारी 3 वाजता कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम क्रमांकाची कुस्ती महारुद्र काळेल (पुणे) विरुद्ध विशाल हरियाणा यांच्यात होणार आहे. दुसऱया क्रमांकाची कुस्ती अमित करंडे (कोल्हापूर) विरुद्ध संदीप कुमार दिल्ली यांच्यात, तिसऱया क्रमांकाची कुस्ती लिंगराज होनमाने (सोलापूर) विरुद्ध नवीन कुमार (दिल्ली) तर चौथ्या क्रमांकाची कुस्ती आप्पासाहेब इंगळगी (दर्गा तालीम) विरुद्ध कीर्तिकुमार (कोल्हापूर), पाचव्या क्रमांकाची कुस्ती कार्तिक इंगळगी(दर्गा तालीम) विरुद्ध रोहित (लहान कंग्राळी) यांच्यात अशा एकूण तीस कुस्त्या होणार आहेत.
खानापूर-यल्लापूर राज्यमार्गावरील व्हन्नरामाई देवीच्या तलावात कुस्तीचा आखाडा बनवण्यात आला आहे. कुस्त्या यशस्वी करण्यासाठी गेले महिनाभर आयोजक धडपडत आहेत. गेल्या 22 वर्षांपासून दरवषी मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात श्री व्हन्रारामाई देवीचा यात्रोत्सव साजरा होतो. यावषी दि. 3 रोजी सकाळी 10 वा. देवीची पूजा व त्यानंतर ओटय़ा भरण्याचा कार्यक्रम होणार आहे..