Tarun Bharat

झेवियर्स, संत मीरा, जोसेफ, सेंट पॉल्स विजयी

फादर जेकब कार्वालो चषक फुटबॉल स्पर्धा : केएलएस, एमव्हीएम संघांची  विजयी सलामी

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

सेंट पॉल्स पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित फादर जेकब कार्वालो चषक सेव्हन ए साईड आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेत उद्घाटन दिवशी सेंट झेवियर्स, संत मीरा, सेंट जोसेफ, सेंट मेरीज, केएलई निपाणी, एमव्हीएम, केएलएस बी, सेंटपॉल्स संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजयी सलामी दिली.

सेंटपॉल पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लुईस रॉड्रीगज, सेंटपॉल्स पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य फादर स्टीव्हन अलबेडा, मॅथ्यू बारदेशकर, फादर बेनिटो डिसोजा, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी दोन्ही संघाच्या खेळाडुची ओळख व चेंडूला कीक करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मुलींच्या पहिल्या सामन्यात सेंट झेवियर्स संघाने डीपी संघाचा 2-0 असा पराभव केला. झेवियर्सतर्फे आलिशा ब्रोजेस हिने दोन गोल केले. दुसऱया सामन्यात संत मीरा संघाने सेंट झेवियर्स ब संघाचा 3-0 असा पराभव केला. संत मीरातर्फे रेनिवारने दोन तर दीपिकाने एक गोल केला. तिसऱया सामन्यात संत जोसेफ संघाने एमव्हीएमचा 1-0 असा पराभव केला. जोसेफतर्फे प्राप्ती सुग्ना हिने एक गोल केला.

मुलांच्या पहिल्या सामन्यात सेंटपॉल संघाने ज्योती सेंट्रल संघाचा 3-0 असा पराभव केला. सेंटपॉल्सतर्फे अभिनवने दोन तर उजफाने एक गोल केला. दुसऱया सामन्यात सेंटपॉल्स ब ने सेंट मेरीज संघाचा 3-0 असा पराभव केला. सेंटपॉल्सतर्फे नवलने दोन तर अथर्व एक गोल केला. तिसऱया सामन्यात मराठा मंडळ संघाने केएलई निपाणी संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. मराठा मंडळतर्फे रितेशने एक गोल केला. चौथ्या सामन्यात संत मीरा संघाने केएलएस अ चा 2-1 असा पराभव केला. संत मीरातर्फे रिहान एक तर एक स्वयंचित गोल झाला. पाचव्या सामन्यात एमव्हीएम संघाने जीवन ज्योती संघाचा 1-0 असा पराभव केला. सहाव्या सामन्यात केएलएस ब संघाने प्रोसेस ब्लॉसम संघाचा 7-0 असा पराभव केला. केएलएसतर्फे नमित पाटील, साकीब जागिरदार, चैतन्य रामगुरवाडी यांनी प्रत्येकी दोन तर तन्मय पाटील एक गोल केला. शेवटच्या सामन्यात एमव्हीएम संघाने मराठा मंडळ संघाचा 3-1 असा पराभव केला.

Related Stories

गणेशपूर रोडवरील जलवाहिनीला गळती

Amit Kulkarni

रेशनचा तांदूळसाठा नेसरगीजवळ जप्त

Omkar B

बेळगाव -सुलधाळ मार्गावर धावले ताशी 120 कि.मी. वेगाने इंजिन

Amit Kulkarni

व्यापाऱयांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Patil_p

जिल्हय़ात लॉकडाऊन वाढविण्याचा विचार

Amit Kulkarni

शहापूर बसवाण गल्लीत कुत्र्याचा तिघांवर हल्ला

Amit Kulkarni