Tarun Bharat

शाओमी 13 प्रो 26 रोजी भारतात होणार लाँच

फास्ट चार्जिंग सपोर्टसह 50 एमपी कॅमेऱयाची सुविधा

वृत्तसंस्था /नवी दिली

मागील वेळी एक अहवाल सादर करण्यात आला होता, यामध्ये शाओमीने 27 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱया मोबाईल वर्ल्ड काँग्रेस दरम्यान जागतिक पातळीवर 13 प्रो या मॉडेलचे अनावरण करण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. त्याप्रमाणे 13 प्रो फोन 26 फेब्रुवारीला भारतीय बाजारात लाँच होणार आहे.

तसेच या दिवशी, शाओमी 13 प्रो कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर आणि त्याच्या फेसबुक व यूटय़ूब व ट्विटरवर लाइव्ह-स्ट्रीम करण्यात येणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनला उत्कृष्ट म्हटलेले आहे.

किंमत

नवीन स्मार्टफोन शाओमीने चीनमध्ये 4 प्रकारात सादर केला होता. त्याचप्रमाणे भारतात सदरचा फोन 4 प्रकारात लॉन्च केला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. यातील 8जीबी व 128जीबी स्टोरेजच्या मॉडेलची किंमत सुमारे 59,200 रुपये आहे. 8 जीबी व 265 जीबी, 12 जीबी 256 जीबी प्रकारातील फोन अनुक्रमे 64,000 रुपये आणि सुमारे रुपये 74,600 मध्ये असतील असे म्हटले जात आहे.

Related Stories

ओप्पोचा फोल्डेबल फोन डिसेंबरमध्ये

Patil_p

येत्या काळात 5 जी स्मार्टफोन्सना वाढणार मागणी

Patil_p

विवोचा नवा स्मार्टफोन लाँच

Patil_p

आता गुगलचं टँगी ऍप

Omkar B

जागतिक स्तरावर टॉप टेन स्मार्टफोनमध्ये आयफोन 12 ठरला अव्वल

Patil_p

‘इनफिनिक्स’चा पहिला 5-जी फोन सादर

Patil_p