बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित 35 वर्षांवरील वरिष्ठांच्या युनियन जिमखाना 35 प्लस प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात एक्स्ट्रीम स्पोर्ट्स युनिव्हर्सला 27 धावांनी तर आर एम चौगुले बीसीसी संघाने अर्जुन स्पोर्ट्स संघा 7 गडय़ांनी पराभव कान प्रत्येकी 2 गुण मिळविले. एक्सट्रीम स्पोर्ट्सच्या संतोष चव्हाणचे शतक हे सामन्यो वैशिष्टय़ होत.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात एक्स्ट्रीम स्पोर्ट्स क्लब नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना संघाने 20 षटकात 6 गडी बाद 195 धावा केला. त्यात संतोष चव्हाणने 13 चौकार व 5 षटकारांसह नाबाद 120 धावा झळकाविल्या. त्याला जयंत जाधवने 38 धावांचे योगदान दिले. युनिव्हर्सलतर्फे सागर गौरगोंडाने 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना युनिव्हर्सल स्पोर्ट्सने 20 षटकात 7 गडी बाद 160 धावा केल्या. त्यात प्रशांत लायंदरने 39, सागर गौरगोंडाने 34, महेश कदमने 27 धावा केल्या. एक्स्ट्रीमतर्फे सागर अंगडीने 2 गडी बाद केले. प्रमुख पाहुणे प्रवीण कराडे, सुनील सक्री, वहाब गोरीखान यांच्या हस्ते सामनावीर संतोष चव्हाण व इम्पॅक्ट खेळाडू सागर गौरगोंडा यांना गौरविण्यात आले.
दुसऱया सामन्यात अर्जुन स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी बाद 120 धावा केल्या. त्यात वीरेश गौडरने 33, राहुल शिंदेने 25, इम्रान अली सय्यदने 20 धावा केल्या. आरएम चौगुले बीसीसीतर्फे प्रवीण कराडेने 4 व विशाल व गौरगोंडाने 2 गडी बाद केले.
प्रत्त्युत्तरादाखल खेळताना आरएम चौगुले संघाने 17.3 षटकात 3 गडी बाद 121 धावा कान सामना 7 गडय़ांनी जिंकला. त्यात गिरीश नाडकर्णीने 43, नारायण मजूकरने 42 धावा केल्या. प्रमुख पाहुणे गजानन जैनोजी, शिवाजी पाटील व सुनील पाटील यांच्या हस्ते सामनावीर प्रवीण कराडे व इम्पॅक्ट खेळाडू नारायण मजूकर यांचा ााषक देऊन गौरविण्यात आले.