10 वर्षांच्या खंडानंतर मये पर्यटनाला पुनर्वैभव : आज येणार पर्यटक बसेस,आमदार प्रेमेंद्र शेट करणार स्वागत
प्रतिनिधी /डिचोली
एकेकाळी जागतिक स्तरावरील पर्यटन स्थळ म्हणून नावाजलेले मये तलाव राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाचा बळी ठरले होते. मात्र आता स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या प्रयत्नाने मये तलावावरील पर्यटन पुन्हा बहरणार आहे. त्यांना पर्यटन खाते व विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने विशेष सहकार्य लाभले आहे. दरम्यान, उत्तर गोवा पर्यटन सफरीसाठी निघणारी एक बस आज शनि. दि. 7 जाने. रोजी दुपारी मये तलावावर दाखल होणार आहे. या बसमधून येणाऱया पर्यटकांचे आमदार प्रेमेंद्र शेट स्वतः उपस्थित राहून स्वागत करणार आहेत.
‘या या मया या’ या एका गीतातून मयेतील सर्वांगसुंदर निसर्गाने नटलेल्या तलावाची कीर्ती सर्वदूर पोहोचली आहे. या घोषवाक्मयाला आता खऱया अर्थाने पुनर्जीवन मिळणार आहे. गेल्या सुमारे 10 वर्षांपासून या मयेच्या तलावावर येणाऱया पर्यटक बसेस बंद झाल्याने या तलावाची रयाच हरपली होती. त्यातच या तलावाच्या निगा आणि आवश्यक साधनसुविधा पुरविण्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्यानंतर या तलावालाही अवकळा प्राप्त झाली होती. त्यामुळे या तलावावर येणाऱया पर्यटकांचीसंख्या रोडावली होती. तसेच या तलावाच्या दयनीय अवस्थेमुळे या तलावावर येणाऱया पर्यटन महामंडळाच्या तसेच खासगी पर्यटन बसेसनीही पाठ फिरवली होती.
या तलावाला पुन्हा नवा साज प्राप्त होण्यासाठी स्थानिक पत्रकारांनीही अनेकदा या तलावाची स्थिती वृत्तपत्रांद्वारे मांडून सरकारचे लक्ष वेधला होता.तरीदेखील सरकारने दुर्लक्षच केले होते. 2012 साली तत्कालीन उपसभापती आमदार स्व. अनंत शेट यांनी या तलावाचा विषय लावून धरला होता. तत्कालीन पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर यांना मयेत आणून या तलावाची परिस्थिती दाखवून दिली होती.
त्यानंतर तलावाचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने नवीन प्रकल्पाचा आराखडा बनवून पयाभरणीही झाली. माजी आमदार स्व. अनंत शेट यांनी या तलावावर पर्यटन बसेस याव्यात यासाठी बराच प्रयत्न केला होता. या तलावावर पर्यटक बसेस यावेत यासाठी मयेतील लोकांची मोठी मागणी होती. या मागणीची दखल घेत मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी पाठपुरावा केला. याला आता यश आले असून आज शनि. दि. 7 जाने. रोजी दु. 1.30 ते 2.30 या वेळेत पर्यटकांची बस मये तलावावर दाखल होणार आहे. म्हापसा येथील पर्यटक निवासगृहातून सकाळी 9 वा. सदर पर्यटक बस उत्तर गोवा दौऱयासाठी सुटणार आहे. ती बस दुपारी मये तलावावर दाखल होणार. आमदार प्रेमेंद्र शेट हे स्वतः उपस्थित राहून या बसमधील पर्यटकांचे स्वागत करणार आहेत.
मयेतील पर्यटनाच्या पुनर्वैभवासाठी पहिले पाऊल – प्रेमेंद्र शेट
मयेच्या पर्यटन स्थळाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी टाकलेले हे पहिले पाऊल असून या तलावावर पर्यटक बसेस याव्यात म्हणून होणारी मागणी सत्यात उतरणार आहे. दहा वर्षे बंद असलेली ही पर्यटन परंपरा पुन्हा सुरू होत असल्याने मये तलावावर पर्यटक बसेस येण्याची संख्या कमी असणार. पण हळूहळू ही घडी बसवत दररोज या तलावावर मोठय़ा संख्येने पर्यटक बसेस आणण्यासाठी आपले प्रयत्न चालूच आहे. ‘या या मया या’ हे गीत लहानपणापासून ऐकत आम्ही मोठे झालो. परंतु मध्यंतरीच्या काळात मये तलावाची झालेली दुर्दशा पाहून मनाला वेदना होत होत्या. आत या तलावाचा प्रकल्प पूर्ण होऊन त्यावरील पर्यटन बहरत असल्याचे पाहून आनंद होत आहे, असे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी म्हटले.