जिल्हा पोलीस प्रमुखांची सौंदत्ती देवस्थानला भेट
वार्ताहर /बैलहोंगल
सौंदत्ती येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लम्मा देवीच्या दर्शनाला देशातील विविध भागातून मोठय़ा संख्येने भाविक डोंगरावर येतात. त्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी योग्य व्यवस्था करून पार्किंग समस्या दूर करण्याबाबत अधिकाऱयांशी चर्चा केली असल्याचे प्रतिपादन बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी केले.
ते सोमवारी यल्लम्मा डोंगरावर प्रथमच भेटीप्रसंगी तसेच देवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, यल्लम्मा यात्रेला येणाऱया लाखो भाविकांच्या सुरक्षिततेवर यापुढे अधिक भर दिला जाणार आहे. यावेळी त्यांचे मंदिराच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानचे अभियंता ए. व्ही. मुळळूर, रामदुर्ग पोलीस ठाण्याचे डीवायएसपी रामनगौड हट्टी, देवस्थानचे पंडित यडूरय्या, नागरत्ना चोळीन व देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.