प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानकाच्या यार्ड रिमोल्डींगचे काम सुरू आहे. या कामामध्ये व्यत्यय येऊ नये, यासाठी काही एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे बुधवारी बेळगाव रेल्वेस्थानकावर शुकशुकाट पहायला मिळाला. एक्स्प्रेस बंद असल्याने प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. टेन नसल्याने प्रवासी बस, खासगी वाहतुकीवर अवलंबून आहेत.
लोंढा ते मिरज यादरम्यान रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण केले जात आहे. याचबरोबर बेळगाव रेल्वेस्थानकाला नवा लूक देण्याचाही प्रयत्न रेल्वे प्रशासन करीत आहे. रेल्वेस्थानकाच्या यार्ड रिमोल्डींगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूंना नवीन ट्रक घालणे, टॅकसाठी लागणाऱया सिमेंटच्या पट्टय़ा बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बऱयाच टेन रद्द कराव्या लागल्या आहेत. काही टेन तर तब्बल 12 ते 13 दिवस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
बेळगावहून धावणारी म्हैसूर-बेळगाव एक्स्प्रेस 13 दिवस, हुबळी-दादर 8 दिवस, बेळगाव-शेडबाळ पॅसेंजर 12 दिवस रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर-तिरुपती हरीप्रिया एक्स्प्रेस हुबळी येथून तर बेळगाव-बेंगळूर एक्स्प्रेस धारवाड येथून धावत आहे. उर्वरित एक्स्प्रेस गदग-विजापूर, सोलापूरमार्गे वळविण्यात आल्या आहेत. यामुळे बुधवारी रेल्वेस्थानकावर शुकशुकाट होता. प्रवासी नसल्याने रिक्षाचालकांनाही भाडे नव्हते.
प्रवाशांची होतेय गैरसोय
यार्ड रिमोल्डींगच्या कामामुळे ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. काही मोजक्मयाच टेन धावत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बेळगावहून मुंबईला जाण्यासाठी चालुक्मय ही एकमेव एक्स्प्रेस उपलब्ध आहे. तर बेंगळूरला जाण्यासाठी राणी चन्नम्मा एक्स्प्रेस उपलब्ध आहे. यामुळे ट्रेनचे बुकिंग आधीच फुल्ल झाले आहे. प्रवाशांना एक तर खासगी वाहतूक अथवा हुबळीपर्यंत बसने प्रवास करून तेथून टेन पकडावी लागत आहे.