Tarun Bharat

यशस्वी जैस्वालचे नाबाद द्विशतक

Advertisements

वृत्तसंस्था/ कोईमतूर

येथे सुरू असलेल्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात शुक्रवारी खेळाच्या चौथ्या दिवशी दक्षिण विभागाविरुद्ध खेळताना पश्चिम विभागाने 319 धावांची भक्कम आघाडी मिळविली आहे. पश्चिम विभागाच्या दुसऱया डावात सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वालचे नाबाद द्विशतक (209) हे वैशिष्टय़ ठरले.

या अंतिम सामन्यात पश्चिम विभागाने पहिल्या डावात 270 धावा जमविल्यानंतर दक्षिण विभागाचा पहिला डाव 83.1 षटकात 327 धावांत आटोपला. त्यानंतर शुक्रवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर पश्चिम विभागाने आपल्या दुसऱया डावात 85 षटकात 3 बाद 376 धावा जमवित दक्षिण विभागावर 319 धावांची आघाडी मिळविली.

दक्षिण विभागाच्या पहिल्या डावात बाबा इंद्रजितने 14 चौकारांसह 118, मनिष पांडेने 2 षटकार आणि 4 चौकारांसह 48, रवि तेजाने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 34, के. गौतमने 3 षटकार आणि 3 चौकारांसह 43, रोहन कुनूमलने 7 चौकारांसह 31 व कर्णधार हनुमा विहारीने 4 चौकारांसह 25 धावा जमविल्या. पश्चिम विभागातर्फे उनादकटने 4, सेठने 3, चिंतन गजाने 2 आणि कोटियानने 1 गडी बाद केला. दक्षिण विभागाने पहिल्या डावात पश्चिम विभागावर 57 धावांची आघाडी मिळविली.

पश्चिम विभागाने आपल्या दुसऱया डावाला दमदार सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल आणि प्रियांक पांचाळ या सलामीच्या जोडीने 110 धावांची भागीदारी केली. पांचाळने 4 चौकारांसह 40 धावा जमविल्या. कर्णधार अजिंक्मय रहाणे 15 धावांवर बाद झाला. जैस्वाल व श्रेयस अय्यर यांनी तिसऱया गडय़ासाठी 169 धावांची भागीदारी केली. अय्यरने 2 षटकार आणि 4 चौकारांसह 71 धावा जमविल्या. यशस्वी जैस्वालने आपले द्विशतक पूर्ण केले. जैस्वाल आणि सर्फराज खान यांनी चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 58 धावांची भागीदारी केली आहे. जैस्वाल 244 चेंडूत 3 षटकार आणि 23 चौकारांसह 209 तर सर्फराज खान 3 चौकारांसह 30 धावांवर खेळत आहे. दक्षिण विभागातर्फे साईकिशोरने 2 तर के. गौतमने 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

पश्चिम विभाग प. डाव 96.3 षटकात सर्वबाद 270, दक्षिण विभाग प. डाव 83.1 षटकात सर्वबाद 327 (बाबा इंद्रजित 118, मनिष पांडे 48, रवि तेजा 34, के. गौतम 43, कुनूमल 31, हनुमा विहारी 25, उनादकट 4-52, चिंतन गजा 2-33, सेठ 3-51, कोटियान 1-110), पश्चिम विभाग दु. डाव 85 षटकात 3 बाद 376 (यशस्वी जैस्वाल खेळत आहे 209, पांचाळ 40, रहाणे 15, श्रेयस अय्यर 71, सर्फराज खान खेळत आहे 30, साईकिशोर 2-100, के. गौतम 1-139).

Related Stories

ससेक्स क्लबशी हेड करारबद्ध

Patil_p

प्रशिक्षकाच्या भूमिकेत झळकणार राहुल द्रविड!

Amit Kulkarni

जोकोविचच्या गैरहजेरीने नदाल, मेदव्हेदेवला संधी

Patil_p

भारतीय कुस्ती पथकाची तिकिटे रद्द

Patil_p

रुपकुमार दत्ता यांची माहेश्वरी अंधशाळेला भेट

Patil_p

रशियाच्या रूबलेव्हची विजयी सलामी

Patil_p
error: Content is protected !!