Tarun Bharat

यासिन मलिकला जन्मठेप

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत : 

गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणारा फुटीरतावादी नेता यासिन मलिकला एनआयएच्या विशेष कोर्टाने जन्मठेप आणि दहा लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

यासिन मलिक टेरर फंडिग प्रकरणात दोषी आढळला होता. त्याने जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नावाखाली जगभरातून बेकायदेशीर आणि दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारला होता. त्याच्यावर युएपीए कायद्यातील कलम 16 (दहशतवादी कायदा), 17 (दहशतवादी कृत्यासाठी निधी उभारणे), 18 (दहशतवादी कृत्य करण्याचा कट) आणि 20 (दहशतवादी टोळीचा सदस्य), भारतीय दंड विधान कायद्यातील 120-ब (गुन्हेगारी कट) आणि 124-अ (देशद्रोह) आदी कलमांतर्गत गुन्हे दाखल होते. मागील गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी त्याने आपले सर्व आरोप कबूल केले. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला होता.

आजच्या सुनावणीसाठी यासीन मलिकला कडक बंदोबस्तात कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सुनावणी दरम्यान एनआयएने यासिन मलिकला फाशी देण्याची मागणी केली होती. अखेर पटियाला कोर्टाकडून आज यासिनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच त्याला दहा लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

Related Stories

लाल किल्ला अनिश्चित काळासाठी बंद

Patil_p

अनंतनाग : दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद; एका मुलाचाही मृत्यू

datta jadhav

ठरलंय म्हणणाऱ्यांना भाजपची ताकद दाखवू;धनंजय महाडिकांचा इशारा

Abhijeet Khandekar

अपरा एकादशी 6 जून रोजीच!

Archana Banage

विवाह समारंभांवर मार्शलची राहणार नजर

Patil_p

LPG सिलेंडर स्वस्त होण्याऐवजी १०० रुपयांनी महागला

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!