Tarun Bharat

जिल्हा रुग्णालयातून हाकलले; उघड्यावरच झाली प्रसूती

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला किरकोळ कारणावरुन रुग्णालयातून हाकलण्यात आले. त्यानंतर या महिलेची उघडय़ावरच प्रसूती झाली. महिलेने हातानेच बाळाची नाळ तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे सर्वसामान्य लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

प्रतीक्षा सचिन पवार (रा. बाळेगाव झोंबाडी ता. नेर) असे या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग विभागात वार्ड क्रमांक 3 मध्ये पारधी समाजाची महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रात्रभर तिच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यानंतर आज सकाळी किरकोळ कारणावरुन या महिलेला हाकलून दिल्याचा आरोप होत आहे. रुग्णालय परिसरातच सकाळी साडेआठच्या सुमारास उघडय़ावर या महिलेची प्रसूती झाली. तिनेच स्वत:च्या बाळाची नाळ तोडली. उघड्यावर प्रसूती होत असल्याने, परिसरातील नागरिक तिच्या मदतीला धावून आले. प्रसूतीनंतर ही महिला पतीसह गावी निघून गेली. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

अधिक वाचा : राज्यातील पोलीस भरती लवकरच, पुण्यातून 800 जणांना संधी

या संपूर्ण प्रकरणाबाबत जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार म्हणाले, या महिलेची प्रसूती ही रुग्णालयाच्या परिसरात झाली ही बाब खरी आहे. मात्र, तिला कुणीही हाकलून दिले नाही तर ती स्वतः पतीसह निघून गेली. प्रसूतीनंतर तिला पुन्हा रुग्णालयात आणले. मात्र ती थांबण्यास तयार नव्हती. तरीही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.

Related Stories

चंद्रभागेवरील भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू

Omkar B

‘हे’ घर भाडय़ाने देणे आहे

Patil_p

…तर भारतासाठी चीनविरोधात लष्करी कारवाईचा मार्ग खुला

datta jadhav

शाळा दिवाळीनंतरच

Archana Banage

राज्यसभा निवडणूक: भाजपकडून धनंजय महाडिकांच्या नावावर शिक्कामोर्तब

Archana Banage

कोल्हापूर : खामकरवाडी प्रकल्प ओसंडू लागला

Archana Banage